Monkeypox Dainik Gomantak
ग्लोबल

काळजी घ्या! जगात 14 हजार लोकांना मंकीपॉक्सची लागण, 5 मृत्यू

WHO ने मंकीपॉक्स ही नवीन महामारी म्हणून घोषित केली.

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये 2019 च्या अखेरीस कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. यानंतर कोरोना व्हायरस जगातील अनेक देशांच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. परिणामी, त्याचा झपाट्याने प्रसार लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला साथीचा रोग म्हणून घोषित केले. यासोबतच जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला, तर या संरक्षणासाठी जगातील अनेक देशांमध्ये सरकारकडून लॉकडाऊन सुरू झाले. (Be careful 14 thousand people infected with monkeypox in the world 5 deaths)

कोरोना महामारीच्या या प्रसरणातून जगातील अनेक देश अद्याप बाहेर आलेले नाहीत. पण, याच दरम्यान जगात एका नव्या महामारीने तोंड वर काढले आहे. खरं तर, WHO ने मंकीपॉक्स ही नवीन महामारी म्हणून घोषित केली. तर आतापर्यंत जगातील 14 हजार लोकांना या महामारीची लागण झाली तसेच या साथीमुळे आतापर्यंत 5 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे.

गुरुवारी मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत माहिती देताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सच्या 14,000 प्रकरणांची पुष्टी झाली आहे तर आफ्रिकेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

5 दिवसांपूर्वी 11,500 प्रकरणे होती

मंकीपॉक्स जगभर झपाट्याने पसरत आहे. खरेतर, पाच दिवसांपूर्वीच म्हणजेच 15 जुलै रोजी WHO ने जगभरात मंकीपॉक्स संसर्गाच्या 11634 प्रकरणांची पुष्टी केली होती. गुरुवारी हा आकडा 14 हजारांवर पोहोचला. अशाप्रकारे चार दिवसांत संसर्गाचे सुमारे अडीच हजार रुग्ण आढळून आले आहेत.

खरं तर, आत्तापर्यंत अमेरिका, कॅनडामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तसेच मंकीपॉक्सचा संसर्ग जगातील 75 हून अधिक देशांमध्ये आतापर्यंत आढळून आला आहे.

भारतात मंकीपॉक्सची फक्त दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत

जगातील अनेक देशांमध्ये पाय पसरलेल्या या मंकीपॉक्सने यापूर्वी भारतातही दस्तक दिली होती. ज्या अंतर्गत केरळमध्ये 14 जुलै रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला. खरं तर, परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणे आढळून आली होती. ज्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

दुसरीकडे, रविवारी केरळमधूनच मंकीपॉक्सची अजून एक घटना समोर आली आहे. परदेशातून परतणाऱ्या प्रवाशाच्या केरळ विमानतळावर केलेल्या स्क्रिनिंगदरम्यान त्यालाही मंकीपॉक्सच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. ज्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यानंतर त्यांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारे, भारतामध्ये मंकीपॉक्स संसर्गाची दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जे दोन्ही केरळमध्ये नोंदवण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT