Bangladesh General Election 2024 Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh General Election 2024: शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होणार का? रविवारी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका

मित्रपक्षांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची आणि निष्पक्ष निवडणुकासाठी काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी.

Pramod Yadav

Bangladesh General Election 2024: बांगलादेशमध्ये रविवारी (07 जानेवारी) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या दोन दिवस आधी ढाका येथील गोपीबाग परिसरात काही समाजकंटकांनी एका ट्रेनला आग लावली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर, प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी पंतप्रधान शेख हसिना यांच्या राजीनाम्याची आणि निष्पक्ष निवडणुकासाठी काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी केली.

सत्ताधारी अवामी लीग (AAL) पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. मात्र यावेळी एएलला कडवे आव्हान पेलावे लागू शकते. कारण बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) एएलला तगडी टक्कर देत असल्याचे दिसत आहे.

तसेच, सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचे कारण देत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

यावेळी 20 हजार उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. यावेळी शेकडो अपक्षही निवडणूक लढवणार आहेत. उद्याच्या निवडणुकीपूर्वी मतपेट्या सील करुन, राजधानी ढाका आणि देशभरातील मतदान केंद्रांवर पाठवण्यात आल्या आहेत.

बांगलादेशच्या निवडणुका 07 जानेवारीला होतील. मतदान सकाळी 8 वाजता सुरू होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहेत, असे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले.


बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतातील तिघांसह 100 हून अधिक परदेशी निरीक्षक शुक्रवारी ढाका येथे पोहोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगला सलग चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT