Thailand Heavy Rainfall Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Bangkok Flood Heavy Rainfall Crisis 2026: थायलंडची राजधानी बँकॉक शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

Bangkok Flood Heavy Rainfall Crisis 2026: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक भागांमध्ये वाहने तरंगताना दिसत आहेत. या पुराच्या पाण्यातून रस्ते आणि वस्तीच्या भागांमध्ये विषारी साप आणि इतर जलचर वाहून येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले असून अनेक भागांत संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

बँकॉक (Bangkok) फ्लड कंट्रोल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, या विक्रमी पावसामुळे तब्बल 3 लाख 29 हजारांहून अधिक कुटुंबे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार, शहरातील जवळपास 7 लाख नागरिक थेट प्रभावित झाले आहेत. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.

या पावसामुळे विमानतळावरील कामकाजावरही वाईट परिणाम झाला. वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या खराब झाल्याने आणि विमानतळ परिसरात पाणी साचल्याने विमान उड्डाणांसाठी होत असलेली दिरंगाई प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतेय. विमानतळावर प्रवाशांच्या सामानाचे मोठे ढीग साचले असून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी थाई एअरवेजने आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना, व्यवस्थापकांना आणि चक्क लष्कराच्या जवानांना मदतीसाठी बोलावले. प्रवाशांचे अडकलेले सामान त्यांच्या घरी किंवा हॉटेल्समध्ये पोहोचवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

परिस्थितीची गंभीरता पाहता थाई सरकार सतर्क झाले असून बँकॉकसह संबंधित भागांतील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच खासगी कंपन्या, बँका आणि इतर व्यावसायिक संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. हवामान विभागाने पुढील काही दिवस देशाच्या उत्तर, मध्य आणि पूर्व भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. प्रशासनाने नद्यांच्या काठावर राहणाऱ्या आणि सखल भागातील लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT