Attack On Pakistani Army Dainik Gomantak
ग्लोबल

Attack On Pakistan Army: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या टार्गेटवर पाकिस्तानी लष्कर; हल्ल्यात 12 जवान ठार

Balochistan: प्रत्युत्तरादाखल पाक सैनिकांनी काही दहशतवाद्यांनाही ठार केले आहे. यावर्षी बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Ashutosh Masgaunde

Terrorists Killed 12 Jawans of Pakistani Army: पाकिस्तानातील दहशतवादी केवळ पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना लक्ष्य करत नाहीत तर, आता बलुचिस्तानच्या सुई जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला आहे. यामध्ये पाकिस्तानचे 12 सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या दहशतवादी हल्ल्यात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. द न्यूज इंटरनॅशनलने इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या हवाल्याने म्हटले आहे की, सशस्त्र दहशतवाद्यांनी सैनिकांवर हल्ला केला.

दोन दहशतवादीही ठार

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. उर्वरित दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बलुचिस्तान आणि पाकिस्तानमधील शांततेच्या शत्रूंचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दल प्रभावी कारवाई करण्यास तयार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आयएसपीआरने सांगितले की, यापूर्वी झोब येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले होते. बुधवारी पहाटे दहशतवाद्यांनी पोस्टवर हल्ला केला, त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. सुरुवातीला चार जवान शहीद झाल्याची बातमी होती, नंतर हा आकडा 9 वर पोहोचला.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या

या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत दहशतवादी कारवायांमध्ये ७९ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे पाकिस्तानातील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत किमान 271 दहशतवादी हल्ले झाले, ज्यात 389 जणांचा जीव गेला आणि 656 जण जखमी झाले.

यावेळच्या तुलनेत गेल्या वर्षीची परिस्थिती बऱ्यापैकी असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीत 151 हल्ले झाले, ज्यात 293 लोक मरण पावले आणि 487 जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT