Balochistan Liberation Army Dainik Gomantak
ग्लोबल

Balochistan: पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे होणार? बलुच आर्मीचा एक तृतीयांश भागावर कब्जा, पाक सैन्यांवर हल्ले सुरुच

Balochistan Liberation Army: बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नव्हे असे म्हणत नागरिकांनी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे.

Pramod Yadav

बलुचिस्तान: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना बलुचिस्तान देखील स्वातंत्र्यासाठी आक्रमक झाला आहे. बुलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने (BLA) सातत्याने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले करत त्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. BLA पाकिस्तानच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची हत्या केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून समोर येत आहे. तसेच, बलुच आर्मीने बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर ताबा घेतल्याचा दावा केला जात आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करत ते नष्ट केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने तो हल्ला हाणून पाडला. यानंतर बलुचिस्तान देखील स्वातंत्र्यासाठी आक्रमक झाला आहे. बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नव्हे असे म्हणत नागरिकांनी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. तसेच, बलुचिस्तान आर्मीच्या वतीने पाकिस्तानी सैन्यांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत.

बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या तीन दिवसांत समोर आल्या आहेत. बीएलएचे जवान ठिकठिकाणी बलुचिस्तानचा झेंडा फडकावत पाकिस्तानविरोधात आंदोलन करताना दिसत आहेत. बलुचिस्तान आर्मीच्या वतीने पाक सैन्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना देखील ठार केल्याची बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून समोर येत आहे. बीएलएने बलुचिस्तानचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतल्याचा दावा देखील केला जात आहे.

BLA चा एक व्हिडिओ देखील समोर आला असून, एक बीएलए कमांडर चीन आणि पाकिस्तानला बलुचिस्तानमधील माघारी जाण्यास सांगत आहे. बीएलएचे ने अस्लम बलोच यांनी देखील यापूर्वी ताकीद दिल्याचे हा कमांडर बोलताना दिसत आहे. ग्वादर आणि उरलेला बलोच हा बलुचिस्तानचा भाग आहे.

येथील भूभाग आणि समुद्री भागाचे रक्षण करणे आमचा अधिकार आहे. आमचे ऑपरेशन असेच सुरु राहील. चीनने बलुचिस्तानमध्ये आमच्या परवानगीशिवाय प्रवेश केला आणि दुश्मन राष्ट्र पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तान आणि चीनचा CPEC प्रकल्प अपयशी होईल. शी झिंगपिंग यांना माघार घेण्यासाठी अजूनही वेळ आहे, असे हा कमांडर म्हणत आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानची जमीन, पाणी आणि हवाई मार्ग कोंडी केली असताना पाकिस्तानला बलुचिस्तानकडूनही मोठा विरोधाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंदूरनंत बलुचिस्तानमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले होते. दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर आता बलुचिस्तान देखील स्वातंत्र्यासाठी Action mode मध्ये आल्याचे दिसतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT