Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: जगाचा अंत व्हायला किती वर्षे बाकी? बाबा वेंगांच्या 'या' अंदाजाने उडवली झोप

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांची अनेक भाकितेही खरी ठरली आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांची अनेक भाकितेही खरीही ठरली आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक बाबा वेंगा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. बल्गेरियामध्ये जन्मलेले बाबा वांगे यांचे 111 वर्षांपूर्वी निधन झाले, परंतु आजही लोक त्यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. बाबा वेंगा यांनी जगाच्या अंतापासून, युद्ध आणि आपत्तीपर्यंत अनेक भाकीत केली. चला तर मग जाणून घेऊया बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांबद्दल.

बाबा वेंगाची प्रसिद्ध भविष्यवाणी

बाबा वेंगा (Baba Vanga) यांनीही जगाच्या अंताची भविष्यवाणी केली आहे. बाबा यांच्या मते, 5079 साली जगाचा अंत होईल.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2022 मध्ये टोळ भारतावर हल्ला करु शकतात. याशिवाय देशाला दुष्काळासारख्या आपत्तीचाही सामना करावा लागू शकतो.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलणार आहे. त्याच वेळी, अंतराळवीर 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पोहोचतील.

बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2046 मध्ये माणूस वयाच्या 100 वर्षापर्यंत जगू शकतो. एखादी व्यक्ती अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत इतकी प्रगती करेल की, त्याला दीर्घायुष्य मिळेल.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, एक वेळ येईल जेव्हा पृथ्वीवर रात्र थांबेल. 2100 मध्ये पृथ्वी कृत्रिम सूर्यप्रकाशाने प्रकाशित होईल.

बाबा वेंगांची ही भविष्यवाणी 2022 मध्ये खरी ठरली

बाबा वेंगा यांची 85 टक्के भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला जात आहे. बाबा वेंगा यांनी सन 2022 बद्दल केलेल्या भाकितांपैकी दोन भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी युरोपमधील दुष्काळाच्या समस्येचे भाकीत केले होते. यंदा पोर्तुगाल (Portugal) आणि इटलीमध्ये पाणीटंचाई जाणवली. पाण्याच्या वापराबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

याशिवाय, बाबा वेंगा यांनी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आशिया खंडात पुराचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली होती. या वर्षी ऑस्ट्रेलियात महापुराने कहर केला होता. याशिवाय ईशान्य भारत आणि बांगलादेशातही (Bangladesh) पूर आला होता. पाकिस्तान सध्या पुराशी झुंज देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT