Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाचे भारतासाठी भाकीत, यंदा येणार हे मोठे संकट!

Baba Venga Predictions For India: बल्गेरियन फकीर महिला बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर अनेकदा चर्चा केली जाते.

दैनिक गोमन्तक

Baba Venga Predictions For India: बल्गेरियन फकीर महिला बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर अनेकदा चर्चा केली जाते. त्यांनी केवळ आपल्या देशाविषयीच नव्हे तर भारतासह संपूर्ण जगाबद्दलही भाकिते केली आहेत. भारताबाबत बाबा वेंगाच्या एका भविष्यवाणीने लोकांची चिंता वाढवली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये भारतात दुष्काळासदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आतापर्यंत खरी ठरली आहेत.

2022 मध्ये भारतात उपासमारीची निर्माण होईल: बाबा वेंगा

द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी भारताबाबत (India) एक भयावह भविष्यवाणी केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल, ज्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल. टोळांचे थवे भारतावर हल्ला करतील, ज्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होईल आणि देशात दुष्काळ पडेल. भारतात तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 2020 मध्ये टोळांनी राजस्थान, गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेशातील पिकांवर हल्ला केला होता.

यावर्षी 6 पैकी 2 अंदाज खरे ठरले आहेत

बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी 6 भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरत आहेत. यानंतर बाबा वेंगांचे इतर 4 भाकितेही खरे ठरण्याची भीती आहे.

हे 2 अंदाज खरे ठरले

बाबा वेंगा यांनी काही आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) पुराची भविष्यवाणी केली होती. ऑस्ट्रेलियात मुसळधार पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानमध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर होत असून आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बाबा वेंगा यांनी अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचे भाकीत केले होते. सध्या पोर्तुगालमध्ये पाण्याची टंचाई आहे, तर इटलीमध्येही दुष्काळ आहे.

बाबा वेंगाचे इतर 4 भाकिते खरे ठरणार आहेत का?

2022 मध्ये सायबेरियातून नवीन प्राणघातक विषाणूचा प्रसार होईल. याशिवाय, त्यांनी एलियन आक्रमण, टोळ आक्रमण आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.

कोण होत्या बाबा वेंगा

बाबा वेंगा एक फकिर होत्या. त्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या. बाबा बेंगा यांचा जन्म 1911 साली बल्गेरियात झाला आणि वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांचे दोन्ही डोळे गेले. त्या पाहू शकत नव्हत्या, परंतु असा दावा केला जातो की, देवाने त्यांना दिव्य दृष्टी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT