Salman Rushdie
Salman Rushdie Dainik Gomantak
ग्लोबल

Salman Rushdie Attacked: प्रसिध्द लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला

दैनिक गोमन्तक

Salman Rushdie Attacked In US: न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाबाबत धमक्या आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली होती. इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप रश्दी यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, हल्लेखोराने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्यानंतर रश्दी स्टेजवरुन खाली कोसळले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ रश्दी यांना कसेतरी वाचवले.

दुसरीकडे, 1980 च्या दशकात त्यांना इराणकडून (Iran) त्यांच्या लिखाणासाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी आहे. अनेक मुस्लिम याला ईशनिंदा मानतात. एका वर्षापूर्वी, दिवंगत इराणचे नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी (Ayatollah Ruhollah Khomeini) यांनी रश्दींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारा फतवा जारी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Goa Today's Live News: गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT