PM Modi Austria Visit Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi Austria Visit: PM मोदींचे व्हिएन्ना येथे जोरदार स्वागत; ऑस्ट्रियन कलाकारांनी सादर केले 'वंदे मातरम्'

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रियामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. व्हिएन्ना येथे ऑस्ट्रियन कलाकारांनी मोदींचे स्वागत करण्यासाठी 'वंदे मातरम'चे विशेष सादरीकरण केले.

Manish Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रियामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. व्हिएन्ना येथे ऑस्ट्रियन कलाकारांनी मोदींचे स्वागत करण्यासाठी 'वंदे मातरम'चे विशेष सादरीकरण केले.

भारतीय पंतप्रधानांचे व्हिएन्ना येथील हॉटेल रिट्झ-कार्लटन येथे आगमन होताच कलाकारांकडून हे विशेष सादरीकरण करुन स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी मंगळवारी ऑस्ट्रियात दाखल झाले. ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. नेहॅमर पंतप्रधान मोदींना मिठी मारताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसले.

पंतप्रधान मोदी म्हणाले- जागतिक कल्याणासाठी एकत्र काम करु

पीएम मोदींनी लिहिले, "चान्सलर कार्ल नेहॅमर, हार्दिक स्वागतासाठी तुमचे खूप खूप आभार. मी उद्याही तुमच्याबरोबर चर्चेसाठी उत्सुक आहे. भारत आणि ऑस्ट्रिया मिळून जागतिक कल्याणासाठी एकत्र काम करत राहतील." ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांनीही ट्विटरवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिएन्नामध्ये स्वागत आहे. ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करण्यात आम्हाला आनंद होत आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे केवळ मित्रच नाहीत तर परस्पर भागीदारही आहेत. मी तुमच्या भेटीदरम्यान राजकीय आणि आर्थिक चर्चेसाठी उत्सुक आहे!

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' देऊन अधिकृतपणे सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "...रशियाच्या सर्वोच्च (नागरी) सन्मानाने मला सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे (राष्ट्रपती पुतिन) मनापासून आभार मानतो.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'हा सन्मान केवळ माझा नाही, तर 140 कोटी भारतीयांचा आहे. भारत आणि रशिया यांच्यातील शतकानुशतके मैत्रीचे हे द्योतक आहे. दोन्ही देशांच्या भागीदारीचा हा सन्मान आहे. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशियामधील संबंध गेल्या 25 वर्षांमध्ये मजबूत झाले आहेत. दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारीचा हा सन्मान आहे... दोन्ही देशांदरम्यान तुम्ही जो धोरणात्मक संबंधांचा पाया घातला तो काळाच्या ओघात मजबूत होत गेला.''

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, "क्रेमलिनमध्ये हा मानद पुरस्कार (ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू) प्रदान करताना मला आनंद होत आहे... दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण योगदान दिले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT