Australian Lawmaker Lidia Thorpe  Dainik Gomantak
ग्लोबल

Australian Parliament: 'संसदेत माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला...', रडत रडत ऑस्ट्रेलियन महिला खासदार म्हणाली

Australian Parliament: संसद ही देशाची प्रतिष्ठा असते. येथे देशहिताचे निर्णय घेतले जातात. जनता आपले प्रतिनिधी निवडून इथे पाठवते.

Manish Jadhav

Australian Parliament: संसद ही देशाची प्रतिष्ठा असते. येथे देशहिताचे निर्णय घेतले जातात. जनता आपले प्रतिनिधी निवडून इथे पाठवते. ते लोकशाहीचे मंदिर आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संसदेतून लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

महिला खासदाराचे अश्रू अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. संसदेत रडत रडत लिडिया थॉर्प यांनी लैंगिक छळाचा आरोप केला.

जेव्हा-जेव्हा त्यांना या गुन्ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा होता, तेव्हा त्यांना धमक्या देऊन गप्प केले जात होते. संसदेत महिला (Women) खासदार रडत असल्याचे चित्र आज जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या खासदार लिडिया थॉर्प यांनी संसदेत लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. महिलांना काम करण्यासाठी ही संसद (Parliament) सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगताना त्या रडल्या.

आपल्या भाषणात लिडिया म्हणाल्या की, 'माझ्यावर घाणेरड्या कमेंट करण्यात आल्या. मला एका जिन्याजवळील कोपऱ्यात बसवून अयोग्य स्पर्श करण्यात आले.' थॉर्प यांनी कंझर्व्हेटिव्ह डेव्हिड वान यांच्यावर हे आरोप केले आहेत.

जरी वान यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र, लिबरल पक्षाने वान यांना पक्षातून निलंबित केले.

माझ्यासारखे इतरही बळी आहेत

थॉर्प पुढे म्हणाल्या की, 'लैंगिक छळाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो.' आपल्या बाबतीत काय झाले ते मी सांगितले, असेही त्या म्हणाल्या.

थार्प पुढे म्हणाल्या की, 'माझ्याबाबतीत जबरदस्ती करण्यात आली. ऑफिसच्या गेटमधून बाहेर पडायला मला भीती वाटत होती. मला माहित आहे की, माझ्यासारख्या इतरही महिला खासदार पीडित आहेत, पण त्या त्यांच्या करिअरमुळे कधीच पुढे आल्या नाहीत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT