Ivan Duque Dainik Gomantak
ग्लोबल

कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान ड्यूक यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला

या हल्ल्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक, संरक्षणमंत्री डिएगो मोलानो, गृहमंत्री डॅनियल पालासिओस आणि नॉर्टे डी सॅनटेंडरचे राज्यपाल असे नेते हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती सोमर येत आहे

दैनिक गोमन्तक

कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान ड्यूक यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला झाला आहे. काही दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ उड्डाण करत असताना हा हल्ला झाला आहे .

या हल्ल्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक, संरक्षणमंत्री डिएगो मोलानो, गृहमंत्री डॅनियल पालासिओस आणि नॉर्टे डी सॅनटेंडरचे राज्यपाल असे नेते हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती सोमर येत आहे या हल्याचा एक व्हिडीओ खुद्द राष्ट्रपतींनी शेअर केला आहे या व्हिडीओमध्ये कोलंबियन हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवर अनेक गोळ्या झाडल्या गेल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक एका कार्यक्रमात गेले असताना हा हल्ला झाला आहे.

या नंतर काढण्यात आलेल्या एका निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, 'राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरवर हल्ला झाला असून राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक, संरक्षणमंत्री डिएगो मोलानो तसेच गृहराज्यमंत्री डॅनिएल पॅलासिओस आणि नॉर्टे डी सॅनटॅन्डरचे राज्यपाल सिल्व्हानो सेरानो पूर्णपणे सुरक्षित आहेत.

या हल्यानंतर राष्ट्रपती म्हणाले," आम्ही आमच्या अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीविरूद्ध लढाया थांबवणार नाही. कोलंबियामध्ये असे हल्ले काही नवीन नाहीत. यापूर्वी 14 जून रोजी सैन्य तळावरही कार बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये सैन्य व सामान्य नागरिक यासह 36 लोक जखमी झाले होते .परंतु ही लढाऊ काही केल्या थांबणार नाही."

या हल्ल्यामागे कोण आहे याची पुष्टी झाली नसली तरी कोलंबियाच्या सुरक्षा दलाला हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT