Volodymyr Zelenskyy Dainik Gomantak
ग्लोबल

'रशियाची वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही'; UNSC मध्ये झेलेन्स्कींचा घणाघात

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, 'रशियाची (Russia) वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही.'

दैनिक गोमन्तक

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskiy) यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी रशियावर हल्लाबोल केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, 'रशियाची (Russia) वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही.' (At the UNSC Ukrainian President Volodymyr Zelenskyy said Russia's attitude was no different from that of terrorists)

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित केले. बुचा शहरातील नागरिकांच्या सामूहिक हत्येबाबत ते म्हणाले, ''रशियाची वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही. बुका शहर रशियन सैन्याच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर तिथे सामूहिक कबरी सापडल्या आहेत. लोकांचे मृतदेह सापडले आहेत. किमान 300 नागरिक मारले गेले आहेत. बोरोदंका आणि इतर शहरांमध्येही जीवितहानी वाढू शकते.''

"मला यावर जोर द्यायचा आहे की, आम्हाला शक्य तितक्या पूर्ण, पारदर्शक तपासात रस आहे. ज्याचे परिणाम संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला ज्ञात आणि स्पष्ट केले जातील," असेही झेलेन्स्की यांनी व्हिडिओ संबोधनात सांगितले.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी मंगळवारी सांगितले की, 'रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत स्थान देऊ नये.'

अमेरिकेचे (America) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, ''युनायटेड स्टेट्स अनेक आघाड्यांवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणत आहे. मॉस्कोवर अधिक निर्बंध, युक्रेनसाठी अधिक शस्त्रे आणि रशियन सैन्याने केलेल्या कथित युद्ध गुन्ह्यांची चौकशी, यासंबंधी अमेरिका कारवाई करत आहे.'' सुलिव्हन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "या क्षणी आम्हाला विश्वास आहे की, रशिया आपले उद्दिष्ट बदलत आहे." त्याला "युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील भागांवर" लक्ष केंद्रित करायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT