World Health Organization on Aspartame: अनेकजण साखर आरोग्यासाठी हानिकारक मानून त्याचे सेवन टाळतात. त्यामुळे काहीजण धोका नाही, असे समजून कृत्रिम स्वीटनर वापरतात. अशात WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या संशोधनात आर्टिफिशियल स्वीटनरबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओच्या संशोधनात जगातील सर्वात सामान्य कृत्रिम स्वीटनर्सपैकी एक असलेल्या एस्पार्टमुळे माणसांमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पुढे आले आहे.
याचा अर्थ एस्पार्टमच्या सेवनाने कर्करोगाचा धोका असतो. कोका-कोलाच्या डाएट सोड्यापासून ते मार्स एक्स्ट्रा च्युइंगम आणि इतर काही पेयांमध्ये एस्पार्टमचा वापर केला जातो. जुलैमध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) द्वारे प्रथमच एस्पार्टमला "मनुष्यांनासाठी शक्यतो कार्सिनोजेनिक" म्हणून सूचीबद्ध केले जाईल.
एस्पार्टमचा समावेश असलेले उत्पादन एका व्यक्तीला किती प्रमाणात सेवन करता येईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
एखादी व्यक्ती हानिकारक पदार्थाचे सेवन किती प्रमाणात करू शकते याच्या शिफारशी राष्ट्रीय नियामकांच्या निर्धारासह खाद्य पदार्थांवरील वेगळ्या WHO तज्ञ समितीद्वारे केल्या जातात.
डब्ल्यूएचओची अॅडिटिव्ह्ज जेईसीएफए समिती यावर्षी एस्पार्टमच्या वापराचा आढावा घेत आहे. 1981 मध्ये जेईसीएफएने सांगितले होती की, एस्पार्टेम एका मर्यादेत दररोज सेवन केल्यास सुरक्षित आहे.
मात्र, 60 किलो वजनाच्या प्रौढ व्यक्तीने दिवसातून 12-36 कॅन सोडा (एस्पार्टमच्या प्रमाणात अवलंबून) प्यायल्यास तो धोका ठरतो.
विशेष म्हणजे, एस्पार्टमचा गेल्या काही काळातही विस्तृत अभ्यास केला गेला आहे. गेल्या वर्षी फ्रान्समधील 100,000 प्रौढांमधील एका अभ्यासात असे आढळून आले की ज्यांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम स्वीटनर्स (ज्यामध्ये एस्पार्टमचा समावेश आहे) वापर केला त्यांना कर्करोगाचा धोका किंचित जास्त होता.
डब्ल्यूएचओची अॅडिटिव्ह्ज जेईसीएफए समिती, देखील यावर्षी एस्पार्टम वापराचा आढावा घेत आहे. त्याची बैठक जूनच्या अखेरीस सुरू झाली आणि 14 जुलै रोजी IARC आपला निर्णय सार्वजनिक करेल त्याच दिवशी तिचे निष्कर्ष जाहीर करणार आहेत.
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ बेव्हरेज असोसिएशनचे कार्यकारी संचालक केट लोटमॅन म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या समोर आलेल्या धक्कादायक माहितीबद्दल चिंतित असले पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.