आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सैन्यांमध्ये (Armenia Azerbaijan War) पुन्हा एकदा हिंसक संघर्ष सुरु झाला आहे. आर्मेनियाने दावा केला आहे की, या चकमकीत आमचे 15 सैनिक मारले गेले, तर 12 सैनिक अझरबैजानने पकडले आहेत. त्याने आपला कब्जा केलेला प्रदेश आणि सैन्य (Armenia Army) मुक्त करण्यासाठी रशियाची मदत घेतली आहे. अझरबैजान लष्कराकडून आर्मेनियातील दोन भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही देशांमधील वाद एवढ्या प्रमाणात वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी नागोर्नो-काराबाख भागावर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 44 दिवसांचे युद्ध झाले होते. यामध्ये 6500 लोकांचा मृत्यू झाला, तर 10,000 लोक जखमी झाले. ही लढाई अझरबैजानच्या निर्णायक विजयाने संपली. इस्रायल (Israel) आणि तुर्कस्तानने (Turkey) या युद्धात अझरबैजानला उघडपणे पाठिंबा दिला, तर रशियाने आर्मेनियाला फारशी मदत केली नाही (Armenia Azerbaijan Border Conflict). रशियाच्या (Russia) मध्यस्थीनंतर या दोन देशातील संघर्ष संपला. त्यावेळी शांतता राखण्यासाठी रशियाने नागोर्नो-काराबाखमध्ये आपले 2,000 शांती सैनिक तैनात केले होते.
आर्मेनियाने दोन क्षेत्रे ताब्यात घेतली
आर्मेनिया आणि रशियन वृत्तसंस्थांनी आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, आमच्या सैनिकांवर अझरबैजानी सैन्याने तोफखाना, लहान शस्त्रे आणि चिलखती वाहनांनी हल्ला केला. यामध्ये 15 सैनिक मारले गेले, तर 12 पकडले गेले आणि अझरबैजानच्या सीमेजवळील दोन लढाऊ तळ हिसकावले आहेत. त्याच वेळी, दुसरीकडे अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आम्ही आर्मेनिया (Russia Armenia) च्या मोठ्या प्रमाणावर चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केली. अझरबैजानने आपल्या वक्तव्यात आर्मेनियाच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला दोष दिला आहे. आर्मेनियन सैन्याने अझेरी आर्मी पोस्टवर तोफखाना आणि मोर्टारने गोळीबार केल्याने हे प्रत्युत्तर म्हणून केले गेले असे त्यात म्हटले आहे.
रशियाला मदत करण्यास सांगितले
रशियन न्यूज एजन्सी इंटरफॅक्सने आर्मेनियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव आर्मेन ग्रिगोरिन (Armen Grigorin) यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अझरबैजानने आर्मेनियाचा सार्वभौम प्रदेश (Armenia Azerbaijan Agreement) ताब्यात घेतला आहे. म्हणूनच आम्ही रशियाला आमच्या देशांमधील विद्यमान 1987 (परस्पर संरक्षण) कराराच्या आधारे आर्मेनियाच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास सांगत आहोत. आर्मेनियामध्ये रशियाचा लष्करी तळ आहे. यासोबतच त्याचे सैनिक नागोर्नो-काराबाखमध्ये तैनात आहेत, ज्यांचे काम येथे शांतता राखणे आहे. मात्र आर्मेनियाच्या या आवाहनावर रशियाकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.