iPhone 14 Saves Life Dainik Gomantak
ग्लोबल

iPhone 14 Saves Life: आयफोनमुळे वाचला पत्नीचा जीव; काय आहे नेमके प्रकरण वाचा...

सोशल मीडियावर पतीने शेअर केला अनुभव

Akshay Nirmale

iPhone 14 Saves Life: अॅपल कंपनीचा iPhone 14 हा केवळ एक फोन नसून जीव वाचवणारा मदतनीस असल्याचे सिद्ध होत आहे. iPhone 14 च्या क्रॅश डिटेक्शन फीचरमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. या घटनेचा तपशील Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका यूजरने शेअर केला आहे.

Reddit च्या या युजरचे नाव आहे नाव 'u/unclescorpion'. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकेदिवशी मी पत्नीशी फोनवर बोलत होतो, तेव्हा पत्नी कार चालवत होती. तेवढ्यात अचानक बायकोचा जोरात किंचाळल्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. पुढच्याच क्षणी त्यांच्या फोनवर त्यांच्या पत्नीच्या आयफोनवरून नोटिफिकेशन आले. ज्यात त्यांच्या पत्नीच्या कारला अपघात झाल्याचे म्हटले होते. यासोबतच अपघाताचे नेमके ठिकाणही नोटिफिकेशनमध्ये पाठवण्यात आले होते. इतकेच नाही तर त्यांच्या पत्नीच्या आयफोनमध्ये असलेल्या इमर्जन्सी फीचरने जवळच्या पॅरामेडिक सेवेला फोन करून अपघाताची माहिती दिली होती.

पतीने पुढे लिहिले आहे की, ही माहिती मिळताच ते तातडीने अपघातस्थळी पोहोचले. तोपर्यंत रुग्णवाहिकाही तेथे पोहोचली नव्हती. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघातामुळे पत्नी फोन नंबर सांगण्याच्या स्थितीत नव्हती. या युजरने म्हटले आहे की, अशा आणीबाणीच्या परिस्थितीत, त्याला त्याच्या पत्नीच्या कार अपघाताची माहिती वेळेवर मिळू शकली कारण त्याची पत्नी वापरत असलेल्या अॅपल डिव्हाइसने त्याला त्वरित याची माहिती दिली. त्यामुळे वेळेवर पोहोचून त्याला उपचाराची व्यवस्था करता आली आणि या अपघातात जखमी झालेले दोघेही जिवंत असून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या युजरने लिहिले आहे की, जर आयफोनने हे केले नसते तर मला माझ्या पत्नीच्या अपघाताबाबत कळू शकले नसते आणि तिचे काय झाले असते? iPhone 14 च्या क्रॅश डिटेक्शन फीचरचे करावे तितके कौतुक कमी आहे. पोस्टच्या शेवटी, वापरकर्त्याने लिहिले आहे, "SOS साठी Apple चे आभार."

ऍपलच्या क्रॅश डिटेक्शन फीचरने यापूर्वीही अनेक जीव वाचवले आहेत. अलीकडेच कॅलिफोर्नियातील डोंगराळ रस्त्यावरून प्रवास करणारी कार रस्त्यावरून घसरली आणि खाली 300 फूट खोल दरीत पडली. या घटनेत iPhone 14 च्या क्रॅश डिटेक्शन फीचरने सॅटेलाइटद्वारे मदतीची विनंती करणारे SOS संदेश जवळच्या आपत्कालीन सेवांना पाठवले. या संदेशांमुळे गाडीत उपस्थित असलेल्या दोन्ही जखमींना वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT