Buckingham Palace Interesting Facts Dainik Gomantak
ग्लोबल

Racism In Buckingham Palace: बकिंगहॅम पॅलेसमध्ये पुन्हा वर्णद्वेषाची घटना

यापुर्वी राजकुमार हॅरीची पत्नी मेगन मर्केल हीनेही केले होते वर्णद्वेषाचे आरोप

Akshay Nirmale

Racism In Buckingham Palace: ब्रिटनच्या राजघराण्याचा राजवाडा असलेल्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये पुन्हा वर्णद्वेषाचा प्रकार पुढे आला आहे. राजघराण्यातील एका सदस्यालाच वर्णद्वेषी वक्तव्य केले आहे. राणी कॅमिला यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातच हा प्रकार समोर आला असून त्यावर पॅलेसला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

विशेष म्हणजे राजकुमार विल्यम यांची गॉडमदर असलेल्या महिलेवर वर्णद्वेषाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी एका कृष्णवर्णीय महिलेला वर्णद्वेषी प्रश्न विचारल्याचे येथील प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले आहे. संबंधित महिला आफ्रिकेच्या कोणत्या भागातून ब्रिटनमध्ये आली आहे, असा प्रश्न या गॉडमदरने विचारला होता.

संबंधित महिलेने यापुर्वीही अनेकदा ती इंग्लंडची नागरिक असल्याचे सांगितले होते. पण तिला वारंवार असा प्रश्न विचारले जाणे हे वर्णद्वेषी वृत्तीतून असल्याचे वाटले. तसेच वारंवार हा प्रश्न विचारून संबंधित महिलेचा अपमान करण्याचाही प्रयत्न झाला. विशेष म्हणजे ही घटना राणी कॅमिला यांच्या एका कार्यक्रमात घडली.

हा कार्यक्रम घरगुती हिंसाचाराने पीडीत महिलांसाठी आयोजित केला होता. त्यामुळे एनगोजी फुलानी नावाच्या महिलेने राजघराण्यातील महिलेवर वर्णद्वेषाचा आरोप करत आपले अनुभव कथन केले. फुलानी एका एनजीओमध्ये काम करतात. त्यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बकिंगहॅम पॅलेसकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सदस्याने माफी मागावी, असे म्हटले आहे. तथापि, या निवेदनात संबंधित व्यक्तीचे नाव नाही. तथापि, प्रिन्स विल्यम यांची

83 वर्षीय गॉडमदर लेडी सुझान हसी याच त्या महिला आहेत, असा दावा ब्रिटनमधील अनेक माध्यमांमध्ये केला जात आहे. यापुर्वी राजे चार्ल्स यांचा धाकटा मुलगा राजपुत्र हॅरी याची पत्नी मेगन मर्कल हीने बकिंगहम पॅलेसमध्ये वर्णद्वेष होत असल्याची टीका केली होती. मेगन ही कृष्णवर्णय आहे. राजवाड्यातील कर्मचाऱ्यांनी तिच्या मुलाच्या रंगावर प्रश्न उपस्थित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT