Anand Mahindra Dainik Gomantak
ग्लोबल

Anand Mahindra: ब्रिटनच्या PM लिझ ट्रस यांचा राजीनामा, आनंद महिंद्रांचं ट्विट चर्चेत

Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Anand Mahindra on Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर केवळ 44 दिवसांनी त्यांनी हे पद सोडले. त्यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ट्रस यांचा राजीनामा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्विट समोर आले आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यावर त्यांनी खिल्ली उडवली आहे.

Anand Mahindra नी एक पोस्ट शेअर केली

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट मध्ये म्हटले की, "ब्रिटिश ह्युमर कधीही राजीनामा देऊ शकत नाही." त्यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत. याशिवाय आनंद महिंद्रा यांनी आणखी एक मीम शेअर केले आहे. काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी लिझ ट्रसबद्दल (Liz Truss) एक मीम शेअर केले होते. खरं तर, टॅब्लॉइड डेली स्टारने ट्रस यांच्या फोटोशेजारी रेफ्रिजरेटेड आइसवर्ग लाइव फीड ठेवले आहे. त्यांनी विचारले होते की, भाजीपाला सडण्यापूर्वी यूकेचे पंतप्रधान आपली नोकरी गमावतील. ही पोस्ट शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले की, 'ग्रेट (क्रूर) ब्रिटन (Britain).'

हजारो लोकांनी पोस्ट लाईक केले

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते दररोज ट्विटरवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर जवळपास 500 जणांनी यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT