America Russia Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Vs America: ताबडतोब रशिया सोडा, अमेरिकन दूतावासाचे नागरिकांना आवाहन

Russia-Ukraine War: युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर रशिया सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Manish Jadhav

Russia-US Conflict: युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर रशिया सोडण्याचे आदेश दिले आहेत. रशियन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी अमेरिकन नागरिकांना अटक करु शकतात किंवा त्यांचा छळ करु शकतात, अशी भीती अमेरिकेला वाटत आहे.

मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, 'रशियामध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी त्वरित देश सोडावा. चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्याच्या जोखमीमुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगा. दूतावास पुढे म्हणाले की, 'रशियाला भेट देऊ नका.'

दुसरीकडे, अमेरिकेने (America) वारंवार आपल्या नागरिकांना रशिया सोडण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंशिक जमावबंदीचे आदेश दिले तेव्हा असाच इशारा देण्यात आला होता.

दूतावासाने सांगितले की, 'रशियन सुरक्षा दलांनी खोट्या आरोपाखाली अमेरिकन नागरिकांना अटक केली आहे. त्यांचा छळही करण्यात आला. दूतावासाने पुढे सांगितले की, "रशियन अधिकाऱ्यांनी यूएस नागरीकांविरुद्ध अनियंत्रितपणे स्थानिक कायदे लागू केले आहेत."

राखीव सैनिक तैनात

बीबीसीच्या वृत्तानुसार, ते म्हणाले होते की, आम्ही पाहत आहोत की, आमच्या दिशेने अधिकाधिक राखीव सैनिक तैनात केले जात आहेत. मॉस्कोवरील आक्रमणानंतर सुमारे एक वर्षानंतर, अलिकडच्या काही महिन्यांत अंदाजे 300,000 रशियन राखीव सैन्याची भरती पूर्वेकडील युक्रेनची (Ukraine) आघाडी तोडण्याच्या प्रयत्नात करण्यात आली आहे, बखमुत या प्रमुख शहराचा ताबा घेतल्याने रशियन सैन्याला क्रॅमतोर्स्कमध्ये प्रवेश मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT