Odysseus Spacecraft News: The American Company Moon Lander 'Odysseus' Landed At the South Pole of The Moon Dainik Gomantak
ग्लोबल

Odysseus Spacecraft: चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅडिंगनंतर 6 महिन्यांनी आली आनंदाची बातमी; अमेरिकन प्रायव्हेट कंपनीने रचला इतिहास

First Us Spacecraft To Land On Moon: विशेष म्हणजे, चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी भारताच्या इस्रोकडून ही आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

First Us Spacecraft Odysseus Land On Moon :

अंतराळ विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एखाद्या खाजगी कंपनीने आपले लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कामगिरी करणाऱ्या अमेरिकन कंपनीने इतिहास रचला आहे. ही Intuitive Machines नावाची ह्युस्टन कंपनी आहे.

विशेष म्हणजे, चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी भारताच्या इस्रोकडून ही आनंदाची बातमी आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. याच्या काही दिवसांपूर्वी रशियाचे मानवरहित लुना-25 हे अंतराळ यान नियंत्रणाबाहेर गेले आणि चंद्रावर पडले. अशा परिस्थितीत चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचे जगभरातून कौतुक झाले.

दरम्यान, अमेरिकन कंपनीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे उतरलेल्या मून लँडरला 'ओडिसियस' असे नाव दिले आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, लँडर उतरवताना काही क्षणांसाठी नियंत्रकांचा त्याच्याशी संपर्क तुटला. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे लवकरच पुन्हा सिग्नल मिळू लागले. टिम क्रेन असे फ्लाइट डायरेक्टरचे नाव आहे. यशस्वी लँडिंगबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, 'आम्ही पुष्टी करतो की आमचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहे. तिथून आम्हाला सिग्नलही पाठवत आहेत.' त्याचवेळी, कंपनीचे सीईओ स्टीव्ह अल्टेमस यांनी आनंद व्यक्त केला आणि 'चंद्रावर आपले स्वागत आहे, ओडिसियसला नवीन घर सापडले आहे' असे ते म्हणाले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 80 अंश दक्षिणेला विशेष लँडिंग

ओडिसियसला गेल्या आठवड्यात फ्लोरिडामधील केप कॅनवेरल लॉन्च स्टेशनवरुन लॉन्च करण्यात आले होते. चंद्रावर पोहोचण्यासाठी याने पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. ओडिसियस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 80 अंश दक्षिणेला उतरले. हे तेच क्षेत्र आहे, जिथे अमेरिकेला त्याच्या मानवी मोहिमेचा भाग म्हणून अंतराळवीरांना उतरवायचे आहे.

अमेरिका सध्या 'आर्टेमिस मिशन'वर काम करत आहे. मानवाला चंद्रावर उतरवण्याचा त्याचा उद्देश आहे. याशिवाय, चंद्रावर मानवाला दीर्घकाळ राहण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा स्थितीत भविष्यातील चंद्राशी संबंधित मोहिमांसाठी प्रायव्हेट यानाचे यशस्वी लँडिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT