Imran Khan arrested Dainik Gomantak
ग्लोबल

America On Imran Khan Arrest: 'जगातील लोकशाही तत्त्वांचा...' इमरान खान यांच्या अटकेनंतर अमेरिकेकडून मोठे विधान

America On Imran Khan Arrest: त्यामुळे राजकीय पेच आणखी वाढेल असेही त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

America On Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या अटकेवरुन प्रचंड गदारोळ माजल्याचे दिसून आले आहे.

आर्थिक संकट आणि इमरान खान यांना अटकेमुळे पाकिस्तान मध्ये आर्थिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आता इमरान खान यांच्या अटकेनंतर अमेरिकेने मोठे विधान केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, पीटीआयचे अध्यक्ष इमरान खान यांची अटक ही पाकिस्तानची अंतर्गत बाब आहे. पाकिस्तानी मीडिया 'डॉन' ने आम्ही जगातील लोकशाही तत्त्वांचा आणि कायद्याच्या राज्याचा आदर करण्याचे आवाहन करतो. ही त्यांची अंतर्गत बाब आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने विधान केल्याचे म्हटले आहे.

वॉशिंग्टनमधील विल्सन सेंटरमधील दक्षिण आशियाई घडामोडींचे अभ्यासक मायकेल कुगेलमन यांनी ट्विटरवर लिहिले की, काही काळापूर्वीच पाकिस्तान( Pakistan )चे राजकीय संकट हलके होत असल्याचे दिसत होते, सरकारने पायउतार होण्याचे वचन दिले होते आणि निवडणुकीची तयारी केली होती. तोशाखाना प्रकरणी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पेच आणखी वाढेल असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर अमेरिकेतील पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य मोहसीन दावर यांनी इमरान खान यांच्या अटकेवर आपले मत व्यक्त केले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात , मनगटी घड्याळे विकल्याबद्दल माजी पंतप्रधानांना दोषी ठरवण्यात आले आहे.

अशा क्षुल्लक बाबींवर राजकारणी बदनाम होतात आणि गंभीर आरोपातून निसटतात. राजकारण्यांचा वापर होत असतो आणि मग ते इम्रान खानप्रमाणे टाकून दिले जातात. आम्ही गोल गोल फिरतो, असेही मोहसीन दावर यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, इम्रान खानच्या अनेक समर्थकांनी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर जमून त्याच्या अटकेचा निषेध करत घोषणाबाजी केली.

पीटीआयच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

न्यायालयाने इमरान खानवर 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली असल्याने आता इम्रानची निवडणूक थांबू शकते असे पाकिस्तानच्या राजकारणातील जाणकारांचे म्हटले आहे. त्यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या पक्ष पीटीआयच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT