Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: क्रूरता! 25 हजार पॅलेस्टिनी महिला आणि मुले युद्धात मारली गेली; अमेरिकेने दिली मोठी अपडेट

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. यातच आता, इस्रायलचा खास मित्र अमेरिकेने मोठी अपटेड दिली आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने 25 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना मारले आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. बदला म्हणून, इस्रायलने आतापर्यंत 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची हत्या केली आहे.

हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीमध्ये मारल्या गेलेल्या महिला (Women) आणि मुलांच्या आकड्याबद्दल विचारले असता, ऑस्टिन यांनी खासदारांना सांगितले की, "हा आकडा 25,000 पेक्षा जास्त आहे." ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला संपूर्ण मदत देऊ केली. या हल्ल्यात सुमारे 1,160 लोक मारले गेले.

दुसरीकडे, 7 ऑक्टोबरपासून इस्रायल (Israel) सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. आतापर्यंत जवळपास संपूर्ण शहर जमीनदोस्त झाले आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की 30,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूची संख्या अशा वेळी दिली आहे, जेव्हा अमेरिका स्वतः हे मृत्यू कमी करण्यासाठी इस्रायलवर दबाव वाढवत आहे. अमेरिका गाझामध्ये युद्धविराम आणि नागरी मृत्यू कमी करण्यासाठी दबाव आणत आहे.

तसेच, गाझामधील निष्पाप लोकांवरील इस्रायली सैन्याची क्रूरता कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा आरोप पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. ताज्या प्रकरणात, लोक शहरात अन्नासाठी रांगेत उभे होते, मदतीच्या ट्रकची वाट पाहत होते. यादरम्यान इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 104 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

उपासमारीने गाझामधील परिस्थिती बिकट झाली आहे

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र मानवतावादी समन्वयक रमेश रामसिंघम यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, गाझामधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, गाझाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत आणि उत्तर गाझामधील दोन वर्षांखालील सहा मुलांपैकी एक कुपोषणाने ग्रस्त आहे. जागतिक खाद्य कार्यक्रमाचे उप कार्यकारी संचालक कार्ल स्काऊ यांनी सांगितले की, गाझामधील बाल कुपोषणाची पातळी ही सर्वात गंभीर आहे. परिस्थिती बदलली नाही तर उत्तर गाझामध्ये हाहाकार माजेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT