Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

Trump India Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या नव्या आयात शुल्कावरुन (Tariffs) आता अमेरिकेतच त्यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली आहे.

Manish Jadhav

Trump India Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या नव्या आयात शुल्कावरुन (Tariffs) आता अमेरिकेतच त्यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली आहे. ट्रम्प यांच्या या 'टॅरिफ वॉर'मुळे अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी निर्माण झालेल्या अमेरिका-भारत संबंधांना मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा अमेरिकन खासदारांनी दिला आहे.

अमेरिकेच्या (America) हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे सदस्य असलेले डेमोक्रॅटिक खासदार ग्रेगरी मीक्स (Gregory Meeks) यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर तीव्र आक्षेप घेतला. मीक्स म्हणाले की, ट्रम्प यांची ही 'टॅरिफ तानाशाही' अमेरिका आणि भारत यांच्यातील अनेक वर्षांच्या मेहनतीने तयार झालेल्या रणनीतिक भागीदारीला नुकसान पोहोचवू शकते.

अमेरिकन-भारत संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी

ग्रेगरी मीक्स यांनी पुढे सांगितले की, अमेरिका आणि भारत यांच्यात खोलवर रुजलेले रणनीतिक, आर्थिक आणि सामाजिक संबंध आहेत. अशा परिस्थितीत कोणताही वाद किंवा चिंता असल्यास त्याचे निराकरण लोकशाही मूल्यांनुसार आणि दोन्ही देशांचा परस्पर आदर राखत केले पाहिजे. ट्रम्प यांची कठोर नीती त्या संबंधांना खराब करु शकते, जे अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी तयार झाले आहेत, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

निक्की हेली आणि चीनची प्रतिक्रिया

ट्रम्प यांच्या धोरणावर टीका करणारे ग्रेगरी मीक्स एकटेच नाहीत. याआधी रिपब्लिकन पार्टीच्या भारतवंशी नेत्या निक्की हेली (Nikki Haley) यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेने भारतासारख्या मजबूत भागीदारासोबतचे संबंध खराब करु नयेत. उलट चीनसारख्या देशाला सूट देऊ नये. त्यांनी ट्रम्प यांनी लावलेल्या शुल्क आणि रशियन तेलाच्या खरेदीवरुन भारतावर केलेल्या हल्ल्यांनंतर हे वक्तव्य केले होते.

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर चीनने भारताला समर्थन दिले आहे, हे विशेष आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन (Guo Jiakun) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेला 'व्यापारिक नियमांचा दुरुपयोग' म्हटले. चीन नेहमीच टॅरिफच्या गैरवापराला विरोध करत आला आहे. असेही त्यांनी सांगितले. या घडामोडींवरुन हे स्पष्ट होते की, ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'ला केवळ भारतातूनच (India) नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या देशातून आणि जागतिक स्तरावरही विरोध होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT