America Church Firing Dainik Gomantak
ग्लोबल

America Church Firing: कॅलिफोर्निया चर्च गोळीबारात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

California Church Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका व्यक्तीने चर्चमध्ये गोळीबार केला आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेत अलिकडेच अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. नुकताच कॅलिफेर्नियामधील (California) एका चर्चमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे. (California Church Shooting News)

येथील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने सांगितले की लगुना वुड्स शहरातील जिनिव्हा प्रेस्बिटेरियन चर्चमधून गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. ही घटना दुपारी 1 च्या सुमारास घडली. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

* चर्चमध्ये 30 नागरिक उपस्थित होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून हत्यार देखील जप्त करण्यात आली आहे. ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाच्या प्रवक्त्याने माहिती दिली, गोळीबार झाला तेव्हा चर्चमध्ये 30 लोक हजर होते. चर्चमधील उपस्थितांपैकी बहुतेक लोक मूळचे तैवानचे होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT