Signature Bank Closed: अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरील आर्थिक संकट वाढतच चालले आहे. सिलीकाॅन व्हॅली बँकेनंतर यूयाॅर्कमधील सिग्नेचर बँक बंद झाली आहे. रविवारी अमेरिकेतील नियामकांनी या बँकेला टाळे ठोकले आहे.
गेल्या 3 दिवसात 2 बँका बंद झाल्यामुळे राष्ट्रपती जो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात निर्माण झालेल्या या संकटावर मार्ग काढण्यासाठी आज एक उच्च स्तरिय बैठक बोलावण्यात आली आहे.
न्यूयाॅर्क स्टेट डिपार्टमेंटच्या फायनान्शिअल सर्व्हिसेसकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. फेडरल डिपाॅझीट इन्शुअरन्स काॅर्पोरेशनने सिग्नेचर बँकेला आपल्या ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत बँकेकडे अंदाजे 110.36 अब्ज डाॅलर्सची संपत्ती आणि 88.59 अब्ज डाॅलरचे डिपाॅझीट्स आहेत.
दोन्ही बँका (Bank) दिवाळखोर निघाल्यामुळे राष्ट्रपती जो बायडेन म्हणाले की, याप्रकरणाला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. सिग्नेचर बँक बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
याआधी अमेरिकेतील बँकिंग संकटाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात मोठी समस्या 2008 साली आली होती. त्या वर्षी बँकिंग फर्म लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले. यानंतर अमेरिकेसह जगभरातील मंदीने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.