Pakistan arms deal Dainik Gomantak
ग्लोबल

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

India US Relations: अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविण्याबाबत बजावलेल्या भूमिकेची एक जुनी बातमी लष्कराच्या पूर्व विभागाच्या वतीने मंगळवारी ‘एक्स’च्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

नवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविण्याबाबत बजावलेल्या भूमिकेची एक जुनी बातमी लष्कराच्या पूर्व विभागाच्या वतीने मंगळवारी ‘एक्स’च्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतावर केलेली टीका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी आयात शुल्क लादण्याची दिलेली धमकी या पार्श्‍वभूमीवर भारताच्या वतीने आता आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे दिसत आहे.

‘आजच्याच दिवशी त्यावर्षी’ असे म्हणत पाच आॅगस्ट १९७१ रोजीची वर्तमान पत्रात आलेली बातमी शेअर करण्यात आली आहे. १९५४ पासून अमेरिकेकडून पाकिस्तानला दोन अब्ज अमेरिकी डॉलरची शस्त्रास्त्रे पाठविण्यात आली आहेत,

असे १९७१च्या त्या बातमीच्या मथळ्यात म्हटले आहे. तत्कालीन संरक्षण उत्पादन मंत्री व्ही. सी. शुक्ला यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. १९७१मध्ये बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि भारत-पाक युद्ध होण्याआधी काही दिवस ही बातमी प्रसिद्ध झाली होती.

भारताचे सडेतोड उत्तर

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि युरोपीय देशांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आले. भारतावर होणारी टीका ही ‘अन्याय्य आणि विनाकारण’ आहे, असे या निवेदनात म्हटले असून, अमेरिका आणि युरोपीय देशांनी अलीकडील काळात रशियाबरोबर केलेल्या व्यापाराचाही दाखला या निवेदनात देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: महसूलबुडव्या कंपन्यांचा खाण लिलावात सहभाग, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची टीका

Sunburn Festival 2025: यंदा 'सनबर्न' मुंबईत, पण आमदार मायकल लोबो गोव्यासाठी आग्रही

Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Rashi Bhavishya 07 August 2025: नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील, घरातील वादविवाद मिटण्याची शक्यता; एखादी शुभवार्ता मिळेल

Goa Police: गोवा पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन पीसीआर व्हॅन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप

SCROLL FOR NEXT