Chinese Spy Balloon  Dainik Gomantak
ग्लोबल

Chinese Spy Balloon: केवळ अमेरिकाच नाही तर 40 देशांत चीनने सोडले स्पाय बलून...

अमेरिकेची माहिती; बलूनद्वारे इतर देशांची सीक्रेट्स चोरत होता चीन

Akshay Nirmale

Chinese Spy Balloon: अमेरिकेने चिनी स्पाय बलून खाली पाडला. अटलांटिक महासागरातून या बलूनचे अवशेषही हस्तगत केले. आणि त्यानंतर या बलूनबाबतची चीनची अनेग गुपिते अमेरिका समोर आणत आहे.

चीनचा हा बलून हेरगिरीसाठीच वापरला जात होता आणि याद्वारे कम्युनिकेशन्स सिग्नल पकडले जात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. विशेष म्हणजे, केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातील 40 देशांमध्ये चीनने असे स्पाय बलून सोडल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेने 5 फेब्रुवारी रोजी स्पाय बलून लढाऊ विमानाच्या सहाय्याने पाडला. त्यानंतर बुधवारी त्याचे अवशेष अमेरिकन नौदलाने अटलांटिक महासागरातून गोळा केले.

यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, "आम्हाला माहित आहे की पीआरसी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) ने हे पाळत ठेवणारे फुगे पाच खंडातील 40 हून जास्त देशांमध्ये सोडले आहेत." बिडेन प्रशासन त्या 40 देशांशी थेट संपर्क साधत आहे.

यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सूचनेनुसार हे स्पाय बलून सोडले जातात. याचे संपूर्ण नियंत्रण पीएलएच्या हातात आहे. आमच्या मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चीनच्या अशा कृत्यांवर पाळत ठेऊन चीनचा पर्दाफाश करत राहील.

नेड प्राइस म्हणाले की, "आम्ही आमच्या हितांचे रक्षण करू. ज्यांनी हे बलून अमेरिकेत सोडले अशा PLA शी संबंधित चिनी संस्थांवर कारवाईसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही घुसखोरी हा अमेरिकेच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे. चीनची कृती बेजबाबदार आहे."

अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग

दरम्यान, हा बलून आपलाच असल्याचे चीनने कबूल केले असले तरी तो हेरगिरीसाठी नसल्याचे चीनने म्हटले आहे. हवामान संशोधनासाठी या बलूनचा वापर केला जातो, हे बलून भरकटले होते. अमेरिकेने आमचा बलून पाडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही चीनने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT