Pakistan Economic Crisis:  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: अल्टो 25 लाखांना, तर वॅगनआर कारची किंमत 30 लाख रूपये...

खाद्यपदार्थांपासून ते इतर वस्तू कितीतरी पटीने महागल्या

Akshay Nirmale

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. येथे खाद्यपदार्थांपासून ते इतर सर्व वस्तूही अनेकपटींनी महागल्या आहेत. महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे सोशल मीडियावर लोक सरकारला फटकारत आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार आणि माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्यावर लोक टीका करत आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईमुळे लोकांची अवस्था वाईट आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की सर्वसामान्य कुटुंबाला ते विकत घेणे कठीण झाले आहे. येथे वाहनांचे दरही गगनाला भिडले आहेत.

प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार पाकिस्तानमध्ये अल्टो कारची किंमत 25 लाख रुपयांवर गेली आहे. पाकिस्तानी पत्रकार वजाहत खान यांनी ट्विटरवर गेल्या दशकात पाकिस्तानचे अर्थमंत्री राहिलेल्या नेत्यांची नावे लिहून पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला.

वजाहत खान यांनी ट्विटरवर नवीन कारच्या किमतींच्या बातमीची लिंक शेअर केली आहे. त्यावरून त्यांनी गेल्या दशकात पाकिस्तानचे अर्थमंत्री राहिलेल्या इशाक दार, मिफ्ताह इस्माईल, असद उमर, हाफिजा पाशा, शौकत तरीन, रझा बाकीर, बब्बर जैदी या सर्वांचे कुत्सितपणे आभार मानले आहेत.

विद्यमान आणि माजी मंत्र्यांची नावे लिहून वजाहत यांनी म्हटले आहे की, जसे तुम्ही आम्हाला बिघडवले तसा तुमचा सीट बेल्ट कधीही बिघडू नये.

पाक सुझुकी मोटर कंपनीने मंगळवारी विविध मॉडेल्सची किंमत 115,000 रुपयांवरून 355,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी होंडा अॅटलस कार लिमिटेड आणि इंडस मोटर कंपनीनेही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या.

आता पाकिस्तानात परिस्थिती अशी आहे की इथे अल्टो कारची किंमत 25 लाख आहे तर वॅगनआरची किंमत 30 लाखांच्या पुढे गेली आहे. WagonR VXR ची किंमत 26.29 लाख रुपये झाली आहे तर AGS मॉडेलची किंमत 30.59 लाख रुपये झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT