भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rushi Sunak) ब्रिटनेच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. लवकरच त्यांचा शपथविधी देखील पार पडेल. पहिल्यांदा लिझ ट्रस (Liz Truss) यांच्याकडून पराभव पत्कारल्यानंतर, सुनक दुसऱ्यांदा निवडणूक लढवून पंतप्रधानपदाची शर्यत जिंकले आहेत. लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या ऋषी सुनक यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.(Information About UK prime minister rushi sunak)
1) ऋषी सुनक हे मूळचे पंजाबच्या गुजरांवाला येथील रहिवाशी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच सुनक यांचे आजी आणि आजोबा भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते.
2) ऋषी सुनक यांचे आई-वडिल भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं होतं. सुनक यांचा जन्म 1980 साली इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये झाला.
3) ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत.
4) ऋषी सुनक 2015 साली पहिल्यांदा उत्तर यॉर्कशायरमधील रिचमंड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले आहे.
5) सुनक यांची पत्नी अक्षता मूर्ती ही भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती सुमारे 730 दशलक्ष पौंड इतकी असल्याचा अंदाज आहे.
6) ऋषी सुनक यांनी Goldman sachs बँकेत आणि दोन हेज फंड्ससाठी (hedge funds) काम केलं आहे.
7) ऋषी सुनक यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झाले असून, त्यांचे उच्च शिक्षण विंचेस्टर महाविद्यालय आणि ऑक्सफर्डमधून झाले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए पूर्ण केले आहे.
8) सुनक यांच्या पत्नी अक्षता यांचही इंग्लंडमध्ये मोठं नाव असून, त्यांचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे.
9) ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांचा पाठींबा आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डोंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला.
10) ब्रिटनची अर्थव्यवस्था मागील काही दिवसांपासून गटांगळ्या खात आहे. वाढत्या महागाईमुळे येथे अस्थिरता निर्माण झालेली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.