Al-Qaeda chief Ayman al-Zawahiri Dainik Gomantak
ग्लोबल

'...रशियन आक्रमणाचा बळी ठरला 'युक्रेन,' अल-कायदा प्रमुखाचा व्हिडिओ जारी

अल-कायदा (Al-Qaeda) प्रमुख अयमान अल-जवाहरीने ओसामा बिन लादेनच्या मृत्यूच्या 11 व्या पुण्यदिनानिमित्त पूर्व-रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहरीने ओसामा बिन लादेनच्या मृत्यूच्या 11 व्या पुण्यदिनानिमित्त पूर्व-रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये अल-जवाहरीने युक्रेनवरील हल्ल्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. व्हिडिओमध्ये, अल-जवाहरी (Al-Qaeda chief Ayman al-Zawahiri) म्हणाला की, युक्रेन (Ukraine) "अमेरिकेच्या (America) कमकुवतपणामुळे" रशियन आक्रमणाचा "बळी" ठरला आहे. (Al-Qaeda chief Ayman al-Zawahiri says Ukraine is a victim of Russian aggression because of US weakness)

दरम्यान, दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणाऱ्या SITE इंटेलिजन्स ग्रुपच्या म्हणण्यानुसार, अल-जवाहरीचा 27 मिनिटांचा व्हिडिओ शुक्रवारी जारी करण्यात आला. या व्हिडिओमध्ये दहशतवादी गँगस्टर एका डेस्कवर बसलेला दिसत आहे, जिथे पुस्तके आणि बंदूक देखील ठेवण्यात आली होती.

तसेच, मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करताना, अल-जवाहिरीने 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर इराक (Iraq) आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु झालेल्या युद्धाच्या परिणामाचा उल्लेख यावेळी बोलताना केला. अमेरिकेची स्थिती सध्या कमकुवत आहे. बिन लादेन हा अमेरिकेवरील हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार आणि निधी देणारा होता.

अल-जवाहिरी पुढे म्हणाला की, 'कोरोना महामारीनंतर रशियाचा आक्रमणाचा युक्रेन बळी ठरला.' बिन लादेनला 2011 मध्ये पाकिस्तानातील त्याच्या तळावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकन सैन्याने ठार केले होते.

अल-जवाहिरीने भारताबाबतही गरळ ओकली

अल-जवाहिरीचा ठावठिकाणा माहीत नाही. तो अमेरिकाला हवा आहे. विशेष म्हणजे त्याची माहिती देणार्‍याला US$25 दशलक्षचे बक्षीस दिले जाईल, असे यापूर्वीच घोषित करण्यात आले आहे. अलीकडेच त्याने भारतातील हिजाबच्या वादावरही भाष्य केले होते. अल-जवाहिरीने कर्नाटकातील हिजाब वादाचा वापर भारताला लक्ष्य करण्यासाठी केला होता. त्याने त्यावेळी म्हटले की, 'आपण मूर्तिपूजक हिंदू लोकशाहीच्या मृगजळातून बाहेर पडले पाहिजे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT