AI Chatbot False Intelligence Report US China War Dainik Gomantak
ग्लोबल

चिनी जहाजावर हल्ल्याची तयारी अन् शेवटच्या मिनिटाला ट्विस्ट! AI वरील भरोसा ठरला असता तिसऱ्या महायुद्धाचं कारण; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

AI Chatbot False Intelligence Report US China War: आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरु शकतो, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला.

Manish Jadhav

AI Chatbot False Intelligence Report US China War: आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरु शकतो, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला. एआय चॅटबॉटने तयार केलेल्या एका चुकीच्या सिक्रेट रिपोर्टमुळे अमेरिका आणि चीन हे दोन महासत्ता असलेले देश थेट युद्धाच्या छायेत ढकलले गेले होते. सीएनएनच्या खळबळजनक रिपोर्टनुसार, मध्य पूर्व आशियात इराणी युद्धाच्या तणावादरम्यान एका चिनी जहाजावर अमेरिकन सैन्य कारवाई करणारच होते.

चिनी जहाजात अणुशस्त्रांशी संबंधित घातक साहित्य वाहून नेले जात असल्याचा दावा एका एआयने केला होता. हा रिपोर्ट समोर येताच अमेरिकन सैन्यात प्रचंड खळबळ उडाली आणि अमेरिकेच्या (America) सशस्त्र सैनिकांनी जहाजावर ताबा मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या, तर लढाऊ विमानांनीही हवेत उड्डाण घेतले होते.

परंतु, प्रत्यक्ष लष्करी कारवाईच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांनी या इंटेलिजन्स रिपोर्टची पुन्हा सखोल तपासणी केली. तेव्हा हा रिपोर्ट कोणत्याही मानवी गुप्तचराने नव्हे, तर एका एआय चॅटबॉटने सार्वजनिक माहिती आणि गुप्त माहितीची सरमिसळ करुन तयार केल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकन स्पेशल ऑपरेशन्स कमांडच्या एका विश्लेषकाने जहाजावरील मालाचे विश्लेषण करण्यासाठी या चॅटबॉटची मदत घेतली होती.

एआयने चुकीचा निष्कर्ष काढला आणि विश्लेषकाने कोणतीही पडताळणी न करता त्याला अधिकृत लष्करी रिपोर्टचे रुप दिले. जर अमेरिकन सैन्याने त्या चिनी जहाजावर हल्ला केला असता, तर दोन्ही देशांमध्ये भीषण महायुद्ध भडकले असते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने या घटनेला 'जगाला युद्धाच्या खाईत लोटणारी चूक' असे संबोधले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लष्करी आणि गुप्तचर निर्णयांमध्ये एआयवर अवलंबून राहण्याबाबत जगभरातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पेंटागन आणि अमेरिकन सैन्य सध्या मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण, लक्ष्य निश्चित करणे आणि रसद पुरवठ्यासाठी एआयचा वापर वेगाने वाढवत आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सैन्यात एआयच्या वापराला गती देण्यासाठी विशेष धोरण जाहीर केले. मात्र, या घटनेने एआयच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले. विश्लेषकांवर जलद रिपोर्ट सादर करण्याचा दबाव असल्याने आणि नवीन पिढीतील विश्लेषक एआयच्या उत्तरांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याने अशा धोकादायक चुका पुन्हा घडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT