Baloch Militants Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Baloch Militants Attack: बलुच दहशतवाद्यांनी इराणींना बनवले लक्ष्य, पोलिस ठाण्यावरील हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू

Baloch Militants Attack: पाकिस्तानी लष्कर आणि चिनी नागरिकांवर हल्ले केल्यानंतर आता बलुच दहशतवाद्यांनी इराणच्या पोलीस दलांना लक्ष्य केले आहे.

Manish Jadhav

Baloch Militants Attack: पाकिस्तानी लष्कर आणि चिनी नागरिकांवर हल्ले केल्यानंतर आता बलुच दहशतवाद्यांनी इराणच्या पोलीस दलांना लक्ष्य केले आहे. फुटीरतावादी गटाच्या संशयित दहशतवाद्यांनी दक्षिण-पूर्व इराणमधील एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला, ज्यात 11 पोलिस ठार झाले आणि अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, असे इराणच्या सरकारी टीव्हीने शुक्रवारी सांगितले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत बलुच दहशतवादी गट जैश अल-अदलचे सदस्यही मारले गेल्याचे इराणी मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर अली रजा मारहेमाती यांनी सांगितले की, तेहरानपासून सुमारे 1,400 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्क शहरात पहाटे 2 वाजता झालेल्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मारले गेले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी चकमकीत अनेक हल्लेखोरांना ठार केले.

दरम्यान, सरकारी टेलिव्हिजनच्या वृत्तात या हल्ल्यासाठी जैश अल-अदल या फुटीरतावादी गटाला जबाबदार धरण्यात आले आहे. याच गटाने 2019 मध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, ज्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड फोर्सचे 27 सदस्य ठार झाले होते. अलिकडच्या काही महिन्यांत, इराणच्या सुन्नी-बहुल प्रदेशातील दहशतवादी आणि लहान फुटीरतावादी गटांनी सरकारविरुद्ध बंडखोरीचा भाग म्हणून पोलिस ठाण्यांवर हल्ले केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT