Israel Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Missile Attack: इस्रायलचा सीरियावर क्षेपणास्त्र हल्ला, 4 इराणी सुरक्षा कर्मचार्‍यांचा मृत्यू; इराण संतापला!

Israel Missile Attack: इस्रायल-हमास युद्धाचा चौथा महिना सुरु आहे. दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने सीरियामध्ये प्राणघातक हवाई हल्ला केला आहे.

Manish Jadhav

Israel Missile Attack: इस्रायल-हमास युद्धाचा चौथा महिना सुरु आहे. दरम्यान, इस्रायलच्या लष्कराने सीरियामध्ये प्राणघातक हवाई हल्ला केला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराण संतापला आहे. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये शनिवारी हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. यातच आता, या हल्ल्यासंबंधी इराणने इस्रायलला खुली धमकी दिली आहे.

दरम्यान, इस्रायलने ज्या इमारतीवर हल्ला केला आहे ती सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या इराणने बांधली होती, असे रॉयटर्सने म्हटले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 5 जण ठार झाल्याचा दावा विरोधी युद्ध पर्यवेक्षक सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने केला आहे. इराण समर्थित गटांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान हा हल्ला झाला. स्टेट टीव्हीच्या वृत्तानुसार, पश्चिम दमास्कसमधील माझेह भागात जिथे हल्ला झाला तिथे शेजारील लेबनॉन आणि इराणच्या दूतावासासह अन्य सरकारी कार्यालये आहेत.

बैठकीदरम्यान इस्रायलने हल्ला केला

मध्य पूर्वेतील इराण-समर्थित गटाशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसशी बोलताना पुष्टी केली की, या इमारतीचा वापर रिव्होल्यूशनरी गार्डच्या अधिकाऱ्यांनी केला होता. त्यावेळी बैठक सुरु होती. अधिकाऱ्याने सांगितले की "इस्रायली क्षेपणास्त्रांनी" इमारत पूर्णपणे नष्ट केली, परिणामी 10 लोक मारले गेले. गेल्या महिन्यात दमास्कसमध्ये इस्त्रायली हवाई हल्ल्यात इराणी जनरल सय्यद रझी मौसावी, सीरियातील इराणी अर्धसैनिक रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख सल्लागार ठार झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलने सीरियातील पॅलेस्टिनी आणि लेबनीज कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT