Afghans citizens living in India have expressed hope that only Modi can help Afghanistan  Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानची मदत फक्त 'मोदी'च करु शकतात; भारतातल्या अफगाणिंनी व्यक्त केली आशा

मागच्या अनेक वर्षांपासुन राहत असलेल्या अफगाण (Afghanistan) वंशाचे व्यापारी जहीर खान यांनी व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर भारतात राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाटते आहे. आपले कुटूंबीय आणि नातलगांच्या चिंतेत असणाऱ्या या अफगाणी नागरिकांना आता जगभरातून मदतीची अपेक्षा आहे आणि याच आशेवर हे लोक कायम आहेत. (Afghans citizens living in India have expressed hope that only Modi can help Afghanistan)

विशेषतः या लोकांना भारताकडून मोठ्या आशा आहेत अशा भावना, भारतात मागच्या अनेक वर्षांपासुन राहत असलेल्या अफगाण वंशाचे व्यापारी जहीर खान यांनी व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तान, चीन आणि सौदी अरेबियावर आमचा विश्वास नाही, मात्र भारतावर आमचा प्रचंड विश्वास आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला मोठ्या आशा आहेत, असेही झहीर खान यांनी सांगितले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीच आम्हाला मदत करू शकतात.

'तालिबान शासित अफगाणिस्तानला आम्ही स्वीकारणार नाही'

कोलकात्यातील मलिक बाजारचे व्यापारी असलेले झहीर खान, आज अफगाणिस्तानची परिस्थिती पाहून खूप दुःखी आहे. ते म्हणाले की, तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानला आम्ही कधीही स्वीकारणार नाही. झहीर पुढे असेही सांगतात की, त्यांचे वडील सुमारे 25 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात आले होते.आणि तेव्हापासून ते कोलकाता येथे राहत आहेत.

कोलकातामध्ये अनेक अफगाणींची स्वतःची घरं आहेत. त्यांना त्या भागात 'काबुलीवाला' अर्थात 'काबुलचे लोक' म्हणून ओळखले जाते. हे लोक 1840 च्या आसपास येथे आले होते आणि तेव्हापासून ते कोलकातामध्ये राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT