Taliban in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban: तालिबानचं महिलांसाठी आणखी एक फर्मान, या ठिकाणी जाण्यावर निर्बंध; म्हणे,'हिजाबमुळे...'

Taliban: महिला आणि पुरुष एकत्र असतात आणि महत्वाचे म्हणजे महिला हिजाब वापरत नाहीत.

दैनिक गोमन्तक

Taliban: तालीबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून देशात अनेक बदल झाले आहेत. तालिबानच्या दहशतीमुळे आणि नवनवीन नियमांमुळे नागरिकांच्या रोजच्या जीवनात आणि राहणीमानातदेखील मोठा बदल होताना दिसत आहे.

तालिबानने यापूर्वी महिलांच्या उच्च स्तरावरील शिक्षणावर बंदी घातली होती. मुलींना शिकवायला महिला प्रोफेसर किंवा वरिष्ठ पुरुष शिक्षक असतील अशा प्रकारचे नियम लागू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने नवीन फर्मान काढत महिलांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. महिलांना खुले लॉन असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये एकट्याने किंवा परिवारासोबत जाण्यास मनाई केली आहे.

इस्लामिक गुरु आणि इतर काहींच्या सल्ल्यानुसार हा नियम जाहीर केल्याचे तालिबानने सांगितले आहे. काही लोकांनी महिलांच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याविषय़ी तक्रार केली होती. अशा ठिकाणी महिला आणि पुरुष एकत्र असतात आणि महत्वाचे म्हणजे महिला हिजाब वापरत नाहीत. अशा ठिकाणी महिलांसाठी पडद्याचीदेखील व्यवस्था नाही असे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

तालीबानचे वरिष्ठ अधिकारी बाज मोहम्मद नजीर यांनी म्हटले की आहे की, हे प्रतिबंध केवळ हेरातमधल्या रेस्टॉरंटला लागू आहेत. त्यांनी त्या सगळ्या बातम्यांचे खंडन केले आहे ज्यामध्ये अफगाणिस्तानमधील सगळ्या रेस्टॉरंटना हे नियम लागू असल्याचे म्हटले जात होते. विदेशी फिल्मच्या डीव्हीडी, टीवी शो आणि म्यूजिकवर बंदी घातल्याच्या बातम्यांचेदेखील बाज मोहम्मद नजीर यांनी खंडन केले आहे.

तालिबानने यापूर्वी कोणते निर्णय घेतले आहेत हे थोडक्यात पाहुयात.

  • गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे मुस्लिमांच्या लोकसंख्येवर परिणाम होत असल्याचे तालिबानला वाटत होते. त्यामुळे तालिबानने गर्भनिरोधक गोळ्यांवर बंदी घातली आहे.

  • मुलींच्या शिक्षणावर बंदी

तालिबानने प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलींना एट्रांस एक्झाम देण्यावर बंदी घातली होती. याबरोबरच, महिलांच्या जीममध्ये आणि पार्कमध्ये जाण्यावरदेखील बंदी घातली आहे.

  • महिलांच्या मिडियामध्ये काम करण्यावर बंदी

महिलांच्या शिक्षणांवर बंदी घातल्यावर तालिबानने महिलांच्या मिडियामध्ये काम करण्यावरदेखील बंदी घातली आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, महिला पुरुषांसोबत काम करणार नाहीत त्याचबरोबर अॅंकर म्हणून काम करणार नाहीत अशा प्रकारचे नियम तालिबानने लावले आहेत.

2021मध्ये तालिबान( Taliban )ने अफगानिस्तानचा ताबा घेतल्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध टाकणारे नियम लागू केले आहेत.जगभरातून तालिबानच्या या भूमिकेवर टीका होत असते. मात्र तालिबानच्या म्हणण्यानुसार, इस्लामच्या नियमामनुसार अफगाणिस्तानचा कारभार चालेल. आता भविष्यात तालिबान आणखी कोणते नियम लागू करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT