अफगाणिस्तानवर (Afghanistan) संपूर्ण ताबा मिळवलेल्या तालिबानला (Taliban) धक्के बसायला सुरूवात झाली आहे. कारण आता हळूहळू तालिबान अफगाणिस्तानवरून आपला ताबा गमवत असल्याची माहिती समोर येत आहे . इस्लामिक स्टेट (Islamic State) या दहशतवादी संघटनेचे देशातील जवळपास प्रत्येक प्रांतात वावर आहे. अफगाणिस्तानसाठी संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) राजदूताने सांगितले की अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट वेगाने वाढत आहे आणि आता देशाच्या सर्व 34 प्रांतांमध्ये ISIS अस्तित्वात आहे . संयुक्त राष्ट्रांच्या विशेष राजदूत डेबोरा ल्योन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की तालिबान इस्लामिक स्टेट-खोरासान (ISKP) चा विस्तार थांबवण्यासाठी संशयित ISKP अतिरेक्यांना अटक करत आहेत किंवा त्यांची हत्या करत आहेत.(Afghanistan Escaping from Taliban control)
गेल्या काही दिवसांत तालिबानचा कट्टर-शत्रू इस्लामिक स्टेटने काबूलमध्ये शिया मुस्लिमांवर दोन प्राणघातक हल्ले केले आहेत आणि हाच मुद्दा उचलत आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे सर्वात जास्त लक्ष देणे आवश्यकअसल्याचे मत डेबोरा ल्योन यांनी मांडले आहे. यूएन राजदूत म्हणाल्या की तालिबान आयएसकेपीचा वाढता प्रभाव रोखू शकत नाही. हे पूर्वी काही प्रांत किंवा राजधानीपुरते मर्यादित होते परंतु आता जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये ते उपस्थित आहे आणि ते आता अधिकाधिक सक्रिय होत आहे.
डेबोरा ल्योन म्हणाल्या की, तालिबानच्या आगमनानंतर देशात इस्लामिक स्टेटचे हल्लेही झपाट्याने वाढले आहेत. 2020 मध्ये हल्ल्याची संख्या 60 होती, जी यावर्षी 334 झाली आहे २० वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घेतली आहे. त्यानंतर तालिबानने देशावर कब्जा केला. ते स्वतःला सरकार म्हणून सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, परंतु तालिबान समाजातील इतर घटक आणि महिला आणि मुलींच्या हक्कांचे उल्लंघन करत आहेत हेही तितकंच खरं.
लिओनचे म्हणणे आहे की संयुक्त राष्ट्रांना सतत असे अहवाल मिळत आहेत की तालिबानी सध्या मागील सरकारशी संबंधित लोकांचा आणि सैनिकांचा शोध घरोघरी शोध घेत आहेत . ते अशा या लोकांना जीवे मारत आहेत . आता ढासळती अर्थव्यवस्था आणि दुष्काळामुळे येथील मानवतावादी संकट आणखी वाढू शकते असा धोका देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानातील आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि मानवतावादी कर्मचार्यांना पगार देण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन देखील केले आहे .देशातील आर्थिक पतन बेकायदेशीर ड्रग्स, शस्त्रे, मानवी तस्करी आणि अनियंत्रित चलन विनिमयास कारणीभूत ठरेल, जे केवळ दहशतवादाला खतपाणी घालण्यास मदत करू शकते अशी संभावना संयुक्त राष्ट्रांच्या विशेष राजदूत डेबोरा ल्योन यांनीसांगितली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.