Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan Earthquake: भूकंपाने हादरले अफगाणिस्तान, अनेक इमारती जमीनदोस्त; 1000 हून अधिक जणांचा मृत्यू

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात शनिवारी मोठा भूकंप झाला. येथे 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात इमारत कोसळल्याने 320 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान शनिवारी भूकंपाने हादरले. 6.3 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला, संयुक्त राष्ट्राने 320 मृतांचा आकडा दिला होता.

मात्र रविवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शक्तीशाली भूकंपात 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातील चार गावांना भूकंप आणि आफ्टरशॉकचा तडाखा बसला आहे.

हेरात शहरातील रहिवासी अब्दुल शकोर समदी यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास शहरात पाच भूकंपाचे हादरे जाणवले. त्यानंतर भीतीने सर्व लोक घराबाहेर पडले.

दरम्यान, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) कडून पश्चिम अफगाणिस्तानात झालेल्या 6.3 तीव्रतेच्या भूकंपात 320 लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते.

ज्या पद्धतीने भूस्खलनाच्या आणि इमारती कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत, त्या लक्षात घेता जीवितहानी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हेरतच्या वायव्येस 40 किलोमीटर (25 मैल) होता, हे देशातील सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या भूकंपानंतर 5.5, 4.7, 6.3, 5.9 आणि 4.6 तीव्रतेचे आणखी पाच आफ्टरशॉकही जाणवले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, ग्रामीण आणि डोंगराळ भागातही भूस्खलन झाले आहे.

दुसरीकडे, सोशल मीडियावर (Social Media) शेअर होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत आहेत.

दरम्यान, याविषयी हेरात येथील रहिवासी 45 वर्षीय बशीर अहमद सांगतात, 'आम्ही आमच्या ऑफिसमध्ये होतो आणि अचानक इमारत हादरायला लागली. मी खूप घाबरलो, पण कनेक्शन कट झाल्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी संपर्क करु शकत नाही.'

फैजाबादलाही भूकंपाचा धक्का बसला आहे

त्याचवेळी, सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. या प्रकरणातील जबाबदार लोक सध्या घटनास्थळाची पाहणी करत आहेत.

NCS ने म्हटले आहे की, मंगळवारी अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये भूकंप (Earthquake) झाला. ज्याची तीव्रता रिअॅक्टर स्केलवर 4.7 मोजली गेली. जो सायंकाळी 4.29 च्या सुमारास आला. त्याची खोली 10 किलोमीटर असल्याचे नोंदवले गेले.

NCS ने पोस्ट केले की, ते अक्षांश 36.54 आणि रेखांश 71.20 आहे. फैजाबाद हे अफगाणिस्तानच्या आग्नेयेस 85 किलोमीटर अंतरावर आहे. यापूर्वी, नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

शनिवारी येथे 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनेच ही माहिती दिली आहे. भूकंपाचे केंद्र 10 किमी खोल असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT