Afghanistan: bomb blast In Kabul, gunfire on Defense Minister house  Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: राजधानी काबूल बॉम्ब स्फोटाने हादरले, संरक्षण मंत्र्यांच्या घरावरही हल्ला

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल काल एका मोठ्या बॉम्बस्फोटाने(Kabul Bomb Blast) हादरली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल काल एका मोठ्या बॉम्बस्फोटाने(Kabul Bomb Blast) हादरली आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी (Defense Minister Bismillah Mohammadi) यांच्या घराजवळ मंगळवारी संध्याकाळी कार बॉम्बचा स्फोट झाला आहे.अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून(Afghanistan Home Ministry) या हल्ल्यात चार बंदूकधारी सहभागी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Afghanistan: bomb blast In Kabul, gunfire on Defense Minister)

काबूलमधील संरक्षणमंत्र्यांच्या घरावरील हल्ला सुमारे चार तासांनी संपला मात्र स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला असून काही बंदूकधारी संरक्षणमंत्र्यांच्या घरात घुसल्याची माहिती एक वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्राथमिक अहवालांनुसार, गृहमंत्रालयाने सांगितले आहे की, या हल्ल्यात चार बंदूकधारी सहभागी असून काबूल शहरात अफगाणिस्तानच्या कार्यवाहक संरक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ मंगळवारी रात्री उशिरा अनेक स्फोट आणि तुरळक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजता घडली आणि स्फोटानंतर काही मिनिटांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे .

अफगाणिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट कार बॉम्ब हल्ल्यामुळे झाला असून कार बॉम्ब हल्ल्यात एका अतिथीगृहाला लक्ष्य करण्यात आले जे कार्यवाहक संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांचे आहे मात्र स्फोट झाला त्यावेळी संरक्षण मंत्री तेथे नव्हते.

गेल्या काही आठवड्यांत अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचे प्रमाण अधिक वाढत आहे , कारण तालिबानने अफगाण नागरिक आणि अफगाण सुरक्षा दलांविरोधात आक्रमणे तीव्र केली आहेत कारण मागील काही आठवड्यांत अमेरिकेच्या सैन्याने संपूर्ण माघार घेतली आहे.

अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या जोरदार चकमकी दरम्यान मंगळवारी रात्री स्फोट झाल्याचे मानले जात आहे . दरम्यान, अमेरिकेने सोमवारी सकाळी हवाई हल्लामुले लष्करगाह येथे अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात जोरदार लढाई झाली होती.

गेल्या काही आठवड्यांत तालिबानने देशाच्या ईशान्येकडील प्रांता तखारसह अफगाणिस्तानचे अनेक जिल्हे काबीज केले आहेत.असेही सांगितले जात आहे की सध्या तालिबान देशाच्या 223 जिल्ह्यांवर नियंत्रण ठेवत आहे.तसेच 34 पैकी 17 प्रांतीय राजधानींना तालिबानचा थेट धोका असल्याचेही समजत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT