Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: तालिबानच्या राजवटीत पत्रकारिता धोक्यात; 50 टक्के पत्रकारांना...

Afghanistan: अर्ध्याहून जास्त वर्तमानपत्रेही बंद करण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये तालीबानची राजवट आल्यापासून देशात मोठे बदल झाले आहेत. तालिबानने अनेक योजना बंद करत आपले नियम लागू केले आहेत. आता एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानमधल्या 50 टक्के पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर अर्ध्याहून जास्त वर्तमानपत्रेही बंद करण्यात आली आहेत. तालिबानच्या या निर्णयामुळे वित्तिय संकटही निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

तालिबानने सत्ता हातात घेतल्यानंतर मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. तसेच मुलींना शिकवण्यासाठी वरिष्ठ पुरुष शिक्षक किंवा महिला शिक्षिका यांना नियुक्त करण्याची परवानगी दिली होती.

त्याचबरोबर, गर्भनिरोध गोळ्यांना बंदी घातल्याची माहितीदेखील समोर आली होती. तालिबानच्या म्हणण्यानुसार, गर्भनिरोधक गोळ्या वापरुन मुस्लिमांच्यी लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या गोळ्यांना आता अफगाणिस्तानमध्ये बंदी घातली आहे.

तालिबान( Taliban )च्या अनेक निर्णयामुळे देश उलटा प्रवास करत असल्याचे मत अनेक तज्ञांनी मांडले आहे. जगभरातून तालिबानच्या निर्णयांमुळे अफगाणिस्तानी नागरिकांच्या मुलभुत हक्कांवर गदा आणली जात असल्याची टीका केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT