Afghan citizens are struggling to get out of the country Dainik Gomantak
ग्लोबल

Video: जीव वाचवण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड; पाहा विदारक दृष्य

Afghanistan: काही व्हीडीओ समोर आले आहेत, ज्या व्हीडीओ मधुन अफगाणिस्तानच्या अराजकतेची धग दिसुन येते आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती हा जगभरतील चर्चांचा केंद्रबिंदु झाला आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशाच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात नागरिक आपला जीव धोक्यात घालुन मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करताना दिसता आहेत. अशातच काही व्हीडीओ समोर आले आहेत, ज्या व्हीडीओ मधुन अफगाणिस्तानच्या अराजकतेची धग दिसुन येते आहे.

काबुल विमानतळावर अफगाणिस्तानातुन बाहेर पडण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी विमानात प्रवेश मिळवण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी लोकांनी एकमेकांच्या अंगावर चढत मध्ये जाण्यचा प्रयत्न केला.


अफगाणिस्तानच्या बाहेर जाण्यासाठी लोक एखाद्या लोकल रेल्वेला लटकतात तसे विमानाला लटकताना दिसता आहेत.

वरील व्हीडीओमध्ये दाखववल्याप्रमाणे लोक थेट विमानाच्या चाकांजवळील भागाला लटकले आणि विमानावबरोबर उंचावर गेले. यावेळी विमानाचे चाक बंद होताना या नागरिकांचा खाली पडून मृत्यू झाला.

अफगाणिस्तानची राजधानी काबुल स्थित राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवल्यानंतर अतिशय विचीत्र पद्धतिने तालिबान्यांनी त्याठीकाणी आपले बस्तान मांडले. अत्यंत बेशिस्त पद्धतिने वावरणाऱ्या तालिबान्यांचा हा व्हीडीओ बॉलीवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी ट्वीट केला आहे.

या व्हीडीओमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावरा धावताना दिसता आहेत. यावेळी गोळीबार सुरु असल्याचा आवाज येतो आहे.

दरम्यान, हे सर्व व्हीडीओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये असलेली तालिबान बद्दलची भीती दिसुन येते आहे. येणाऱ्या काळात ही अराजकता अजुन जास्त भयावह रुप धारण करु शकते अशी शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT