रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनवरील हल्ल्याबाबत जगभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. तत्पूर्वी एडल्ट स्टार एलेना बर्कोवा (Elena Berkova) हिचीही जगभरात जोरदार चर्चा होत आहे. बर्कोवा ही तीच महिला आहे जिने 2018 मध्ये पुतिन यांच्या विरोधात रशियात (Russia) अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. चला तर मग जाणून घेऊया एलेना बर्कोवाबद्दल.. (Adult star Elena Berkova Is The President Of Russia Vladimir Putin Was Challenged)
खरं तर, 2018 मध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताना बर्कोवा चर्चेत आली होती. त्यानंतर तिने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात लैंगिक छळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याची वकिली केली होती.
जाहीरनाम्यात म्हटले होते...
तसेच, बर्कोवाने आपल्या जाहीरनाम्यात शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सुरु करण्याची, पुरुषांसाठी घटस्फोट अशक्य बनवण्याची आणि लांब स्कर्ट घालणाऱ्या महिलांना गुन्हेगार ठरवण्याचे नमूद केले होते. मात्र त्यानंतर तिला उमेदवार म्हणून नोंदणी करता आली नव्हती. वास्तविक, त्यावेळी तिचे वय 32 वर्षे होते. आणि नियमानुसार उमेदवाराचे वय किमान 35 वर्षे असायला हवे होते. बर्कोवाने यापूर्वी 2009 मध्ये रशियन शहर सोचीमधून महापौरपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
याशिवाय, इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, आता 36 वर्षांची असलेली बर्कोवा 2004 पर्यंत डल्ट फिल्म्समुळे चर्चेत होती. 2009 मध्ये डोम-2 या रिअॅलिटी टीव्ही शोमध्येही तिने काम केले आहे. दोन वर्षांनंतर, तिला अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
एलेना बर्कोवा या वर्षी जानेवारीमध्ये एमएमए ( Martial Arts ) मध्ये देखील दिसली होती. एडल्ट चित्रपटांपासून ते राजकारण आणि त्यानंतर एमएमएच्या लढाईपर्यंत एलेना अनेकदा चर्चेत राहते. बर्कोवा सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या ग्लॅमरस फोटोंवर लाखो चाहते प्रतिक्रिया देत असतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.