Twitter | Elon Musk  Dainik Gomantak
ग्लोबल

Twitter: ट्वीटरचे सभासत्व महागणार! इलॉन मस्क यांची घोषणा

Twitter: इलॉन मस्कने जेव्हापासून ट्वीटरची मालकी स्वत:कडे घेतली आहे तेव्हापासून ट्वीटरमध्ये सतत काहीतरी बदल होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Twitter: ट्वीटरबाबत सातत्याने नवीन बदल होताना दिसून येत आहेत. इलॉन मस्कने जेव्हापासून ट्वीटरची मालकी स्वत:कडे घेतली आहे तेव्हापासून ट्वीटरमध्ये सतत काहीतरी बदल होत आहेत.

यापुर्वी ट्वीटरच्या टीकबाबत मोठे बदल केल्याचे दिसून आले होते . ब्लू टीक, ग्रे टीक आणि गोल्डन टीक असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी वेगवेगळे टीक असे वर्गीकरण त्यांनी केले आहे. आता पुन्हा ट्वीटरमध्ये बदल करण्यात येत असून त्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे. ट्वीटरमध्ये जाहीरात दाखवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाची बाब म्हणजे ज्या लोकांना ट्वीटर( Twitter ) वापरताना ज्या लोकांना जाहीरात नको आहे त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अर्थात त्यांना जाहीरातशिवाय ट्वीटरचे जास्त पैसे देऊन सभासत्व करावे घ्यावे लागणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. ट्वीटरच्या बिझनेस मॉडेलमध्ये हा क्रांतीकारी बदल असणार असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अनेक रिपोर्टनुसार ट्वीटरची मालकी घेतल्यापासून इलॉन मस्क( Elon Musk ) यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. सर्वाधिक संपत्ती गमावावी लागल्याने त्यांची गिनिज बुकमध्ये नोंद झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT