Pakistan Attack on Minorities Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Attack on Minorities: पाकिस्तानात 19 वर्षीय ख्रिश्चन मुलीवर फेकले अ‍ॅसिड; हिंदु मुलीचेही अपहरण...

धर्मांतर, लग्नाची सक्ती; अल्पसंख्यांकांवर अत्याचाराचे सत्र सुरूच

Akshay Nirmale

Pakistan Attack on Minorities: पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. येथे हिंदू, शीख, ख्रिश्चनांवर अन्याय, अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात.

आताही एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे तर एका ख्रिश्चन मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याचीही घटना घडली आहे.

कराची शहरात कामरान अल्ला बक्ष नावाच्या तरुणाने सुनीता नावाच्या ख्रिश्चन तरुणीवर अ‍ॅसिड फेकल. मुलीने धर्मांतर करून लग्न करण्यास नकार दिला होता. अ‍ॅसिड फेकण्यात आल्याने मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली असून या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कामरान याचे पीडीतेवर एकतर्फी प्रेम होते, त्यातूनच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ही घटना कराचीच्या फ्रेरे पोलीस स्टेशन परिसरात घडली. पीडित सुनीता मसिह ही १९ वर्षांची असून ती मासूम शाह कॉलनीत कुटुंबासह राहते. आरोपी कामरान हा पीडितेचा शेजारी असल्याचे समजते.

सुनीताचे काका जॉन मसिह यांनी सांगितले की, 1 फेब्रुवारी रोजी सुनीता कराचीच्या काला पुल भागात काही कामासाठी गेली होती. ती कॅन्टोन्मेंट परिसरातून बसमध्ये चढत असताना कामरानने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले.

हल्ल्यानंतर कामरान घटनास्थळावरून पळून गेला. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे सुनीताचे शरीर 20 टक्के भाजले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुनीताने सांगितले की, कामरानच्या हल्ल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर, पायांना आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली.

ती रस्त्यावर पडली आणि रडू लागली. कामरान सुनीतावर ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता.

हिंदू मुलीचे अपहरण

दरम्यान, पाकिस्तानातील मीरपूरखास शहरातही काही मुस्लिम तरुणांनी एका 17 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केले आहे. पीडित तरुणी मीरपूरखास पोस्ट ऑफिसमधून परतत असताना ही घटना घडली.

मीरपूरखासचे हिंदू नेते राजिंदर शर्मा यांनी पाकिस्तानातील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मुली सुरक्षित नाहीत. पाकिस्तान सरकार त्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. अपहरण करून जबरदस्तीने लग्न केले जाते, धर्मांतर केले जाते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT