earthquake  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनच्या शिनजियांग भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप! 4 जणांचा मृत्यू तर 41 जखमी

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शनिवारी पहाटे 3:29 वाजता चीनच्या शिनजियांग भागात रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शनिवारी पहाटे 3:29 वाजता चीनच्या शिनजियांग (Xinjiang) भागात रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, हा भूकंप 36.78 अक्षांश, 78.79 रेखांश आणि 10 किमी खोलीवर बसला आहे. (A magnitude 4.3 earthquake shook the region of Xinjiang in China)

यापूर्वी 8 जून रोजी, चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्र (CENC) नुसार, नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील आबा तिबेट-कियांग (Aba Tibetan-Qiang) प्रीफेक्चरच्या मेरकांग शहराला शुक्रवारी सकाळी 00:03 वाजता (बीजिंग वेळेनुसार) 5.8 तीव्रतेचा भूकंप बसला. चीन भूकंप नेटवर्क केंद्र (CENC) नुसार 6 जून रोजी, चीनच्या शिनजियांग प्रदेशात 5.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला आहे.

1 जून रोजी नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील याआन शहरातील लुशान काउंटीला संध्याकाळी 5:00 वाजता 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. एजन्सीनुसार, भूकंपाचे केंद्र, 17 किमी खोलीसह, 30.37 अंश उत्तर अक्षांश आणि 102.94 अंश पूर्व रेखांशावर निरीक्षण करण्यात आले आहे.

सिचुआनमधील याआन शहराला 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर सुमारे 14,427 लोकांना त्याची तिव्रता जाणवली, असे स्थानिक माध्यमांनी प्राथमिक आकडेवारीचा हवाला देताना सांगितले आहे. शहराला हादरे बसलेल्या या भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून 41 जण जखमी झाले आहेत, असे शहराच्या भूकंप मदत मुख्यालयाने सांगितले आहे.

यापूर्वी, शहराच्या भूकंप मदत मुख्यालयाने सांगितले की याआनमधील एकूण 13,081 लोकांना भूकंपाचा फटका बसला होता परंतु नवीन आकडेवारीनुसार ही संख्या लक्षणीय वाढली आहे, असे शिन्हुआने वृत्त दिले. CENC नुसार, 15 एप्रिल रोजी, वायव्य चीनच्या किंघाई प्रांतातील डेलिंगा शहराला रिश्टर स्केलवर 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

सिन्हुआनुसार, भूकंपाचे केंद्र 38.52 अंश उत्तर अक्षांश आणि 97.33 अंश पूर्व रेखांशावर 10 किमी खोलीसह निरीक्षण करण्यात आले आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील महिन्यात 13 एप्रिल रोजी, चीनच्या सिचुआन प्रांतातील यिबिन शहरातील झिंगवेन काउंटीला 5.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. दरम्यान, शनिवारी पहाटे 04:55 वाजता दक्षिण इराणमध्ये 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT