Crime Dainik Gomantak
ग्लोबल

कराची विद्यापीठात स्फोट, जीवितहानीची शक्यता

पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या (Pakistan) कराची विद्यापीठात मंगळवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले आहे. मात्र, या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट कराची (Karachi) विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका कारमध्ये झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जिओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका व्हॅनमध्ये स्फोट झाला.

प्रसारमाध्यमांनी सांगितले की, स्फोटानंतर बचाव आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केले आहे. पोलीस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्हॅनमध्ये हा स्फोट झाला त्यात सात ते आठ जण होते. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप देण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

SCROLL FOR NEXT