China Lockdown Dainik Gomantak
ग्लोबल

LockDown In China: चीनमध्ये 8 जिल्ह्यांतील 66 लाख लोकसंख्या लॉकडाऊनमध्ये

एकाच दिवसात कोरोनाचे 31 हजार रूग्ण आढळले; GDP च्या 20 टक्के भागात लॉकडाऊन

Akshay Nirmale

LockDown In China: चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे 31,454 नवे रूग्ण आढळे आहेत. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी दैनंदिन रूग्णसंख्या आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून दररोजच्या रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.

चीनी प्रशासनाने झेंगझाऊ आणि आसपासच्या 8 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण 66 लाख लोक आहेत. या आदेशापुर्वी दीड महिन्यांपासून या भागातील 2 लाख लोकसंख्या राहत असलेल्या परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. नवा आदेश शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

बीजिंगपासून ते चोंगकिंग आणि ग्वांगझू या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग स्थिर आहे. दरम्यान नव्याने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच नवीन तात्पुरती हॉस्पिटल्स उभारली जात आहेत.

चीनच्या GDP च्या 20 टक्के भागात लॉकडाऊन

लॉकडाऊनचा परिणाम चीनच्या उद्योग, व्यापारावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनच्या जीडीपीमध्ये योगदान देणाऱ्या एकूण 20 टक्के क्षेत्रात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. निर्बंधांमुळे अनेक गोष्टी थबकल्या आहेत. केंद्रीय बँकेनेही विकासदर 4.3 टक्क्यांवरून कमी करून 4 टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे. विकासदर घटटण्याचे प्रमुख कारण दोन एप्रिलपासून शांघायसारख्या मोठ्या आणि प्रमुख उद्योग हबमध्ये दोन महिने असलेले लॉकडाऊन हे देखील आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात एकाच दिवशी येथे 28,000 हून अधिक रूग्ण आढळून आले होते.

झिजियांग आणि तिबेट भागात अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अधिकारीच वैतागले आहेत. कोरोनावर नियंत्रणासाठी शांघाय सारख्या मोठ्या शहरात पुर्णतः लॉकडाऊन करणे योग्य नाही. त्यामुळे येथे झीरो कोव्हिड धोरण अवलंबविण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT