Nail Hit Dainik Gomantak
ग्लोबल

धक्कादायक ! मुलासाठी भोंदूबाबाने गरोदर महिलेच्या डोक्यात ठोकले खिळे

पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर शहरात मुलगा हवा म्हणून एका गर्भवती महिलेसोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानातील पेशावर शहरात मुलगा हवा म्हणून एका गर्भवती महिलेसोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गरोदर पाकिस्तानी महिलेला मुलगा झाल्याच्या अटीवर उपचार करणाऱ्या एका बाबाने उपचाराच्या नावाखाली खिळे ठोकले. दरम्यान एका पाकिस्तानी डॉक्टराने बुधवारी ही माहिती दिली. मुस्लीमबहुल पाकिस्तानमध्ये (Pakistan) गूढ शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या सुफी परंपरेतील बाबांकडे उपचारासाठी जाणे सामान्य आहे. इस्लामधील अनेक गटांमध्ये असे करण्यास मनाई आहे. दक्षिण आशियात (South Asia), मुलगा असणे ही मुलगी असण्यापेक्षा चांगल्या आर्थिक सुरक्षिततेची हमी मानली जाते. (5 Cm Nail Hit In Pregnant Woman's Head)

दरम्यान, डॉक्टर हैदर खान यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की, पीडित महिला पाकिस्तानच्या वायव्य भागातील पेशावरमधील (Peshawar) रुग्णालयात दाखल झाली होती. गर्भवती असल्याने वेदना सहन केल्यानंतर महिलेने स्वतः खिळे काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती काढू शकली नाही.

शेवटी महिलेच्या डोक्यामध्ये ठोकण्यात आलेले खिळे काढल्यानंतर डॉक्टर हैदर खान म्हणाले, "ती पूर्णपणे शुद्धीत होती परंतु अत्यंत वेदना होत होती." ते पुढे म्हणाले, "आगोदरच तीन मुलींची आई असलेल्या महिलेला अजून एक मुलगी होणार आहे."

शिवाय, डॉक्टर खान यांनी सांगितले की, हा खिळा महिलेच्या डोक्यात हातोडा किंवा जड वस्तूने मारण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT