Bangladesh Fire Twitter
ग्लोबल

बांगलादेश आग दुर्घटनेतील मृतांची संख्या 50 च्या पार; वाढत्या आकड्याने चिंतेत भर

या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून घटनास्थळाचे जे चित्र समोर आले आहे त्यावरून आग खूपच गंभीर असल्याचे दिसून येते

दैनिक गोमन्तक

बांगलादेशातील चितगाव येथे काल रात्री एक भीषण अपघात घडली . येथील कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 49 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येत असून 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चितगावमधील सीताकुंड उपजिल्ह्यात कदमरसूल भागात बीएम कंटेनर डेपो आहे. हा एक खाजगी डेपो आहे. शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास या गोदामात मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे रसायनांना आग लागून ती तत्काळ पसरली. (Bangladesh Fire)

या गोदामात रसायनांनी भरलेल्या कंटेनरव्यतिरिक्त इतर काहीही नव्हते आणि कोणी कामगारही नव्हते. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असताना मोठा स्फोट झाला. त्यानंतर आग सर्वत्र पसरली. एसआय नुरुल आलम यांनी सांगितले की, आग रात्री नऊच्या सुमारास लागली, परंतु काही तासांनंतर एक मोठा स्फोट झाला. एका कंटेनरमध्ये केमिकल असल्याने आग एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये पसरली. रेड क्रिसेंट यूथ चितगाव येथील आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्तकुल आलम यांनी बांगलादेशी स्थानिक माध्यमांना मृतांच्या संख्येची पुष्टी केली.

स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारती हादरल्या

आगीनंतर विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान मदतीसाठी म्हणून धावलेले तेवढ्यात आगीमुळे रसायनांच्या कंटेनरचे एका मागून एक स्फोट होत गेल्याने आग प्रचंड भडकून अनेक जण या आगीत होरपळले. त्यात किमान चाळीस जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडे चारशेहून अधिक जण भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चितगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) एसएम रसीदुल हक यांनी रविवारी चीनी मीडिया आउटलेट शिन्हुआला सांगितले की, गंभीररित्या भाजल्यामुळे चितगाव मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला होता. बहुतेक पीडितांना किरकोळ ते गंभीर दुखापत झाली. तर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळाचे जे चित्र समोर आले आहे त्यावरून आग खूपच गंभीर असल्याचे दिसून येत आहे, असे चितगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT