Deadbody found in Kenya Dainik Gomantak
ग्लोबल

Kenya: पाद्रीने सांगितले उपाशी राहा अन् 45 हून अधिक लोकांनी अंधश्रद्धेमुळे गमावला जीव

लोक उपासमारीने मरण पावले हे सिद्ध करण्यासाठी पोलीस घटनेत सापडलेल्या मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Kenya: केनिया या आफ्रिकन देशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या देशात 45 हून अधिक लोकांनी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून आपला जीव दिला आहे. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून या लोकांनी उपाशीपोटी सामूहिक आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

पुजाऱ्याच्या सांगण्यावरून जवळपास 47 जणांनी उपाशीपोटी आत्महत्या केली आहे. स्थानिक पोलिसांनी पाळकाच्या मालकीच्या जागेतून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. केनियातील शाकाहोला येथून पोलिसांना अधिक मृतदेह मिळत असल्याने अंधश्रद्धेमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पास्टरच्या सांगण्यावरून या लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 3 दिवसांपासून केनियातील स्थानिक पोलिस घटनास्थळावरून मृतांचे मृतदेह बाहेर काढत आहेत. केनियाचे मालिंदी काउंटी पोलिस प्रमुख जॉन केंबोई यांनी या घटनेची माहिती दिली.

पास्टर पॉल मॅकेन्झी यांच्या मालकीच्या जमिनीवर आणखी कबरी खोदण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडल्यानंतर 14 एप्रिल रोजी पुजारीला अटक करण्यात आली होती. पोलीस प्रमुखांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी केनियातील मालिंदी येथील पाद्रीच्या मालमत्तेवर छापा टाकला. यादरम्यान पोलिसांना एकामागून एक मृतदेह मिळत गेले. केनिया डेली वेबसाइटनुसार, लोक उपासमारीने मरण पावले हे सिद्ध करण्यासाठी पोलीस घटनेत सापडलेल्या मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत.

पास्टर पॉल मॅकेन्झी यांचे नाव अंधश्रद्धेशी संबंधित प्रकरणात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2019 मध्ये दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी पाद्रीचे नाव समोर आले होते. या घटनेत त्याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी पाद्रीला अटक केली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

त्यादरम्यान पुजाऱ्याला 10,000 केनियन शिलिंग म्हणजेच भारतीय चलनात 6,000 रुपये दंड भरावा लागला. आता पुन्हा एकदा अत्यंत गंभीर प्रकरणात पास्टर पॉल मॅकेन्झी यांचे नाव समोर आले आहे. यावेळी अंधश्रद्धेपोटी मोठ्या संख्येने लोकांनी स्वर्गात स्थान मिळावे आणि येशूला भेटण्यासाठी पुजाऱ्याच्या सांगण्यावरून सामूहिक आत्महत्या केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT