Pakistan polio team Attack Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात पोलिओविरोधी पथकावर बंदूकधाऱ्यांचा हल्ला; 2 पोलिसांसह 3 जण ठार

पाकिस्तानच्या आदिवासी जिल्ह्यात, अज्ञात हल्लेखोरांनी पोलिओविरोधी लसीकरण पथकावर हल्ला केला

दैनिक गोमन्तक

पेशावर: पाकिस्तानच्या अशांत उत्तर वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात, अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी पोलिओविरोधी लसीकरण पथकावर हल्ला केला, ज्यात दोन पोलिसांसह तीन जण ठार झाले. पाकिस्तान पोलिसांनी ही माहिती दिली. अफगाणिस्तानला लागून असलेल्या या जिल्ह्यात यावर्षी पोलिओचे नऊ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यांच्या विरोधात लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक टीम घरोघरी फिरत होती. त्यानंतर बंदूकधाऱ्यांनी या टिमवर हल्ला केला, ज्यात संघातील एक सदस्य आणि त्यांना संरक्षण देणारे दोन पोलिस ठार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Pakistan polio team)

अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये पोलिओविरोधी लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या टिमवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. या वर्षी मार्चमध्ये, वायव्य पाकिस्तानमध्ये पोलिओविरोधी मोहिमेत भाग घेऊन घरी परतणाऱ्या महिला पोलिओ कर्मचाऱ्याची बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, वायव्य पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण कर्मचार्‍यांच्या पथकाचे रक्षण करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याची बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जगातील एकमेव देश आहेत जिथे पोलिओ पुर्णपणे नाहिसा झाला नाही.

अलीकडेच, लंडनमधील सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये चार दशकांत प्रथमच पोलिओव्हायरस आढळल्यानंतर पाकिस्तानचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. इस्लामाबादमधील आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा आहे की यूकेमध्ये सापडलेला “vaccine-derived virus” 22 देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि स्थानिक पातळीवर आढळलेला प्रकार वाइल्ड पोलिओव्हायरस (WPV) होता. पाकिस्तानने या वर्षी मे महिन्यात 43 दशलक्षाहून अधिक मुलांना लसीकरण करण्यासाठी देशव्यापी पोलिओविरोधी मोहीम सुरू केली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दुसर्‍या पोलिओ मोहिमेचे उद्घाटन केले आणि आश्वासन दिले की पाकिस्तान सरकार पोलिओ रोगाचे उच्चाटन करण्यासाठी सर्व उपाययोजना करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT