CRIME NEWS  Dainik Gomantak
ग्लोबल

डेन्मार्कच्या कोपनहेगन गोळीबारात 3 ठार, 3 जखमी

रविवारी कोपनहेगन मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत तर या गोळीबारात अनेक जण जखमी देखील झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

डॅनिश पोलिसांनी सांगितले की, रविवारी कोपनहेगन मॉलमध्ये (Mall) झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले आहेत तर या गोळीबारात अनेक जण जखमी देखील झाले आहेत. तसेच त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. कोपनहेगनचे पोलीस प्रमुख सोरेन थॉमसन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, गोळीबारानंतर अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय संशयिताची पोलिसांनी ओळख पटवली, परंतु त्याचा तपशील पूर्णपणे समजलेला नाही. (3 killed 3 injured in Denmark Copenhagen shooting)

थॉमसनने अटक केलेल्या संशयिताला "एथेनिक डेन" म्हटले, परंतु याबाबतचा निर्णय घेण खूप लवकर होऊ शकतं. पोलीस प्रमुख म्हणाले की, "आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही हे नाकारू शकत नाही की ही दहशतवाद्यांनी केलेली घटना आहे." त्या व्यक्तीने हे काम इतर लोकांच्या सहकार्याने केल्याचे कोणतेही संकेत आम्हाला मिळाले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. शॉपिंग मॉल्ससह संपूर्ण कोपनहेगनमध्ये पोलिसांची तैनाती देखील वाढत आहे.

कोपनहेगनमध्ये यंदाच्या टूर डी फ्रान्स सायकलिंग स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा हल्ला झाला आहे. टूर आयोजकांनी एक निवेदन जारी करून या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यात पुढे म्हटले की, "टूर डी फ्रान्स या संपूर्ण घटनेसाठी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो."

घटनास्थळावरील चित्रांमध्ये मुले आणि त्यांचे पालक इमारतीतून पळून जाताना आणि रुग्णवाहिका कर्मचारी लोकांना स्ट्रेचरवर घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. साक्षीदारांनी सांगितले की, जेव्हा पहिला गोळीबार झाला तेव्हा त्यांनी 100 हून अधिक लोक मॉलमधून बाहेर पडण्यासाठी धावताना पाहिले होते.

हल्ल्याच्या वेळी मॉलमध्ये असलेल्या थिया श्मिट यांनी सांगितले की: "आम्ही अनेक लोक अचानक बाहेर पडताना पाहिले आणि त्यानंतर आम्हाला मोठा आवाज झाला मग आम्हीही तेथून पळ काढला." कोपनहेगन पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, "शहर केंद्र आणि विमानतळादरम्यान असलेल्या अमेजेर जिल्ह्यातील मोठ्या फील्ड मॉलभोवती मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत. "आम्ही घटनास्थळी आहोत, गोळीबार झाला आणि अनेक लोक जखमी झाले आहेत," पोलिस म्हटले.

या घटनेनंतर पोलिसांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या येण्याची वाट पाहण्याचे आवाहन केले, आणि यासोबतच इतर लोकांना या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले. संध्याकाळी साडेसात वाजता मॉलच्या आजूबाजूचे रस्ते अडवण्यात आले, मेट्रो थांबवण्यात आली आणि एक हेलिकॉप्टर देखील डोक्यावरून उडत होते. जोरदार सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांनी लोकांना तेथे येण्यास मनाई केली आणि स्थानिकांना त्यांच्या घरी परतण्यास सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT